Agriculture Research : वनस्पती पेशींमध्ये रोगप्रतिकारक नॅनोबॉडीजचा विकास शक्य

वनस्पतींच्या पेशीमध्ये आवश्यक त्या विषाणूसाठी प्रतिकारक, प्रतिरोधक नॅनोबॉडीज विकसित करण्याचे तंत्र अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
Agriculture research
Agriculture researchAgrowon

वनस्पतींच्या पेशीमध्ये आवश्यक त्या विषाणूसाठी प्रतिकारक, प्रतिरोधक नॅनोबॉडीज विकसित करण्याचे तंत्र अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. या नॅनोबॉडीजचा वापर विविध प्रकारच्या रोगकारक घटकांना अटकाव करणे, उपचार करणे या उद्देशाने करता येईल. त्यामुळे केवळ पिकांचेच रोगापासून संरक्षण करता येईल, असे नाही तर मानवी सार्वजनिक आरोग्य संस्थाही बळकट करता येतील.

Agriculture research
Agriculture Research : संशोधनासाठी शेतकरी शास्त्रज्ञांत सुसंवाद हवा

नॅनो तंत्रज्ञानाविषयी सातत्याने माहिती समोर येत असताना याचा शेतीमध्ये काय उपयोग असा प्रश्‍न अनेकांच्या मनामध्ये उद्‍भवत असेल. कोणत्याही मूलभूत संशोधनाला सुरुवात होत असताना त्याचे उपयोगीपण अनेक वेळा लक्षात येत नाही. याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नॅनो तंत्रज्ञानाविषयी उदासीनता होती. मात्र गेल्या काही काळापासून नॅनो तंत्रज्ञानावर आधारित अनेक खते, कीडनाशके उपलब्ध होऊ लागली आहेत. त्याच मालिकेमध्ये अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवा विभागातील शास्त्रज्ञांनी रोगकारक घटकांना त्वरित रोखणाऱ्या अतिसूक्ष्म घटकांची (नॅनो बॉडीज) निर्मिती वनस्पतींच्या पेशीमध्ये केली आहे. या नॅनो बॉडीजचा वापर मानवी आणि पिकामध्ये येणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी करता येणार आहे. अगदी कोविड १९ सारख्या संसर्गजन्य आणि प्राणघातक अशा विषाणूजन्य रोगांचाही सामना त्यातून आपल्याला करता येईल, असा विश्‍वास हे शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

Agriculture research
Agriculture Research : कृषी विद्यापीठांचे संशोधन ‘लॅब टू लँड’ जाणे गरजेचे

अमेरिकन कृषी शास्त्रज्ञांनी लिंबूवर्गीय फळझाडामध्ये येणाऱ्या सिट्र्स ग्रिनिंग या रोगाच्या प्रतिरोध आणि उपचारासाठी नॅनोबॉडीजचा वापर करून प्रयोग केले. आता या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पेटंटेड ‘सिंबियोंट टीएम’ तंत्रज्ञानाच्या साह्याने या नॅनोबॉडीज वनस्पतीच्या शरीरामध्ये कशा प्रकारे तयार होतात, हे दाखवले. एकदा त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये तयार होऊ लागल्या तर संपूर्ण कृषी क्षेत्र आणि सार्वजनिक आरोग्याच्या रचनेमध्ये त्यांचा वापर करणे शक्य होईल.

हे तत्त्व संकल्पनात्मक पातळीवर सिद्ध करण्याच्या उद्देशाने शास्त्रज्ञांनी या नॅनोबॉडीजचा प्रयोग सार्स कोविड २ च्या विषाणूंवर करून पाहिला. वनस्पतीच्या पेशींमध्ये नॅनोबॉडीज सार्स कोविड २ च्या ग्रहणक्षम प्रथिंनाना बांधून टाकू शकत असल्याचे दिसून आले. या ग्रहणक्षम काटेरी प्रथिनांच्या साह्याने हा विषाणू मानवी पेशींना घट्ट पकडून ठेवतो. त्यामुळे त्यांचा प्रसार होतो.

Agriculture research
Agriculture Drone : ड्रोनद्वारे फवारणी केल्यास प्रभावी कीड व्यवस्थापन शक्य ः कुलगुरू डॉ. मणी

या विषयी माहिती देताना शास्त्रज्ञ रॉबर्ट शॅटर्स, ज्यू. म्हणाले, की आम्ही प्राथमिक पातळीवर शाश्‍वत पद्धतीने पिकातील रोगांवर उपाय मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र अधिक अभ्यास करत असतानाच या तंत्रज्ञानाचे उपयोग केवळ शेतीपुरतेच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठी वनस्पती आधारित उपचारांसाठी होऊ शकत असल्याचे पुढे आले. या अभ्यासातून भविष्यात कोविड १९ वर वनस्पतिजन्य प्रथिन आधारित उपचार शक्य होऊ शकतात.

कोणत्याही सजीवामध्ये होणाऱ्या रोगांचा प्रकार थोडाफार वेगळा असला तरी त्यांची प्रादुर्भाव करण्याची पद्धती बऱ्यापैकी सारखी दिसून येते. त्यामुळे अॅग्रोसोर्स, इंक यांच्या सहकार्याने अमेरिकी कृषी संशोधन विभाग वनस्पती आधारित नॅनोबॉडीज उत्पादनाची प्रक्रिया विकसित करत आहे. कृषी शास्त्रज्ञ मायकेल हेक यांनी सांगितले, की कृषी आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये उभ्या राहत असलेल्या आव्हानांचा मुकाबला करत असताना नॅनोबॉडीज तंत्रज्ञान अधिक फायदेशीर सिद्ध होऊ शकते. रोगांच्या प्रसार, प्रादुर्भाव रोखण्यापासून आतपर्यंत जाऊन योग्य त्या जागी उपचार करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे.

नॅनोबॉडीज म्हणजे काय?

नॅनो म्हणजे एक मीटरच्या एक अब्जावा भाग. इतक्या लहान आकारातील कणांच्या समुदायाला नॅनोबॉडीज असे म्हणतात. या नॅनोबॉडीजमध्ये प्रथिने, खनिजे, धातू यांचा समावेश असू शकतो.

नैसर्गिकरीत्या अशा नॅनोबॉडीज उपलब्ध

असतात का?

उंट, अल्पाकास (alpacas- पातळ केस असलेली बकरी) आणि लामाज (llamas- लोकर असलेला मेंढीसदृश प्राणी) अशा काही विशिष्ट प्रकारच्या प्राण्याच्या शरीरामध्ये नैसर्गिकरीत्या अतिसूक्ष्म प्रतिरोधक प्रथिने (नॅनोबॉडीज) तयार होतात. अशाच प्रकारे वनस्पतींच्या पेशीमध्येही नैसर्गिकरीत्या नॅनोबॉडीज तयार करणे शक्य असल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

या तंत्रज्ञानाचा व्हिडिओ येथे पाहता येईल.

https://youtu.be/XOdK3De8f60

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com