World Of Businesses : व्यवसायाचे विस्तारलेले विश्‍व

यांत्रिकीकरणानंतर व्यवसायांचा विस्तार वाढला. सुरुवातीला लाकूड उद्योग, घरे बांधण्याचा उद्योग, कापड उद्योग, तेल आणि रसायन उद्योग, खाद्य इत्यादी उद्योग होते. हे उद्योग मुख्यतः नैसर्गिक सामग्रीवर अवलंबून होते.
World Of Businesses : व्यवसायाचे विस्तारलेले विश्‍व

यांत्रिकीकरणानंतर व्यवसायांचा विस्तार वाढला. सुरुवातीला लाकूड उद्योग, घरे बांधण्याचा उद्योग, कापड उद्योग, तेल आणि रसायन उद्योग, खाद्य इत्यादी उद्योग होते. हे उद्योग मुख्यतः नैसर्गिक सामग्रीवर अवलंबून होते. लाकडापासून हत्यारे बनवणे. बैलगाडी-रथ बनवणे, घराचे दरवाजे, विहिरीवरील मोटा चालविण्यासाठी रहाट असे लाकडासंबंधी व्यवसाय होते.

World Of Businesses : व्यवसायाचे विस्तारलेले विश्‍व
Agro Idol: स्वत:च स्वत:चे आयडॉल बना

भारताच्या १९०१ मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये रेल्वेचे जाळे चाळीस हजार कि.मी. एवढे विस्तारलेले होते. त्या वेळी रेल्वेने मुख्यतः अन्न -धान्याची वाहतूक होत होती. या जनगणनेमध्ये बंगालमध्ये तागाचे एकूण ३४ कारखाने सुरू होते. त्यामध्ये सुमारे एक लाख कामगार होते. मुंबईमध्ये १३८ कापड गिरण्यांमध्ये १.०७ लाख कामगार काम करीत होते. ९० टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती होता.

ग्रामीण भागातील व्यवहार हा वस्तूंमधून चालत असे. त्यामुळे धान्य, तेलबिया, शेंगदाणे, फळे देऊन शेतात न पिकणाऱ्या तेल, मीठ, चहा, कापड या वस्तू खरेदी केल्या जात. पिके शेतात उभी राहिल्यापासून खळे उलगडीपर्यंत वाणा-सौदा, मीठ, कुंकू, बांगड्या, सुई-दोरा, पोत, मिठाई, कापड, भांडी-कुंडी, शिवलेले कापड या वस्तू तेली, शिंपी, कुंभार, कासार हे हाळकरी लोक विकत असत.

शेतकरी शेतमजूर, कुळे, सरकारी उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, मिल कामगार व खाण उद्योगासारख्या मोठ्या उद्योगात सर्वांत जास्त लोकसंख्या सामील होती. दुसरा मोठा वर्ग हा कुटीर उद्योग म्हणजे विणकाम करणारे, लोहार, सोनार असे ग्रामीण कारागीर यांचा भरणा होता. अनेक लोक हे एकापेक्षा जास्त व्यवसाय करून आपले पोट भरण्याचा प्रयत्न करत.

आधुनिक काळात आता उद्योगांचे आणि व्यापाराचे विश्‍व विस्तारलेले आहे. वस्तूंची उत्पादने करणारे उद्योग हे निर्मिती उद्योग म्हणून, बांधकाम उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि सेवा उद्योग असे उद्योगांचे मुख्य प्रकार मानले जातात. गेल्या दहा दशकांमध्ये शहरीकरण ५२ टक्केपर्यंत पोहोचले आहे. पारंपरिकरीत्या भारतातील व्यवसाय हे स्थानिक ज्ञानावर व कच्च्या मालावर अवलंबून होते. त्यांना जगभरातून मागणी होती.

परंतु ब्रिटिशांच्या काळात स्थानिक उद्योगांचे मोठे नुकसान झाले. कल्पकता आणि नावीन्य याला स्थान उरले नाही. जगात प्रसिद्ध असलेल्या सिल्क आणि कापूस मार्गाचे भारत हे मध्यवर्ती ठिकाण होते. इ.स. १७०० मध्ये जगाच्या सकल उत्पन्नामध्ये भारताचा वाटा २४.४ टक्के एवढा होता. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर कारखाने वाढविण्यासाठी लागणारे विविध परवाने किचकट नियम, टॅक्स परवाना फी, बँकिंग क्षेत्र यामध्ये झालेल्या सुधारणांमुळे व्यवसायाचे जगच जणू बदलून गेले.

आता माहिती तंत्रज्ञान, उद्योग, टेलिकॉम उद्योग, औषध उद्योग, ऑटोमोबाइल, हॉटेल, वस्त्र अभियांत्रिकी, करमणूक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये भारताने मोठे नाव कमावले आहे. नावीन्यात आणि तंत्रज्ञान या दोन्ही शब्दांमुळे जणू व्यवसाय क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. गेल्या तीन दशकांमध्ये अनेक जुने व्यवसाय मोडीत निघाले व नवीन व्यवसाय नावारूपाला आले. ग्रामीण महाराष्ट्रातील एकेकाळी प्रत्येक गावामध्ये दिसणारे तेलाचे घाणे, लोहार उद्योग, सुतार उद्योग हे दिसेनासे झाले आहेत. विविध सेवा पुरवणारे उदा. मिरची कांडप यंत्रे, टेलर, रफू काम करणारे, टांगावाले, पाटा वरवंटा तयार करणारे, कॅसेट विक्रेते, गोधडी शिवणारे, सुया-पोत विकणारे लोक दिसेनासे झाले आहेत.

शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, आय.टी. पार्क आणि त्याबरोबर फास्ट फूडची हजारो दुकाने, आइस्क्रीम पार्लर, सायबर कॅफे सगळीकडे दिसू लागले आहेत. १९९० पर्यंत डॉक्टरकडे जाताना घरची रिकामी औषधाची बाटली घेऊन जाणारे लोक दिसेनासे झाले आहेत. दूध, तूप, तेल, फळांचे रस, ताक आता टेट्रा पॅकमधून विक्रीला आहेत.

World Of Businesses : व्यवसायाचे विस्तारलेले विश्‍व
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

व्यवसायांचे क्षेत्रसुद्धा अधिक स्पर्धात्मक होत असून, इंटरनेटमुळे आणि ऑनलाइन मार्केटमुळे शहरातील दुकान कोणत्या महत्त्वाच्या बाजार पेठेत आहे याचे महत्त्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या सणाच्या तीन ते चार दिवसांत जेवढा व्यवसाय करतात तेवढा व्यवसाय शंभर दुकानदार वर्षभरात पण करत नाही.

तरुण विद्यार्थी कॉलेजमध्ये असतानाच स्वतःची स्टार्टअप कंपनी काढण्याच्या विचारात आहेत. बहुजन समाजाची पहिली पिढी शेतीमध्ये, दुसरी पिढी नोकरीमध्ये तर तिसरी पिढी व्यवसायात उतरायला तयार आहे. ग्राहकांच्या दृष्टीने ‘ग्राहक देवो भवं’ असे दुकानात लिहिलेले वाक्य प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

मात्र अशा वेळी ऑनलाइन फ्रॉड आणि खोट्या आमिषाला बळी पडून ज्या व्यवसायांचा ज्यांनी कधी कोणी विचार केला नसेल अशी कुठलीच वस्तू न विकणारे व दुसऱ्यांच्या बँकेतील पैसे काढून घेणारे उपद्रवी व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. बदलत्या या मार्केटिंगच्या जगात माणूस अधिक गोंधळलेला पाहायला मिळत आहे. आपल्यात कुठलीच पात्रता नसताना व अर्ज केलेला नसताना २५ लाख पगाराची नोकरी कशी मिळते व ५० लाखाची लॉटरी त्यांना कशी लागते, असा साधा प्रश्‍न त्याला पडत नाही. हेच खरे आव्हान ठरेल!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com