
Buldana News : शेतीमालाला भाव मिळत नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करीत कुटुंबासह इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी देऊळगाव मही येथील शेतकरी मधुकर उत्तमराव शिंगणे या शेतकऱ्याने केली आहे. या बाबत पोलिसांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवले आहे.
श्री. शिंगणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, की देऊळगावमही येथे कुटुंबासह शेती करीत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे.
आता भाजीपाला शेतीकडे कुटुंब वळाले. पण भाजीपाला पिकास शासनाच्या धोरणात हमीभाव नाही. ग्राहकांच्या मागणीवर भाव अवलंबून असल्याने कवडीमोल बेभाव विकत आहे. सध्या शेतात फुलकोबी पीक आहे.
मात्र भाव आणि मागणी नसल्याने पिकावरील उत्पादन खर्च व मजुरीसुद्धा निघत नसल्याने नाइलाजास्तव एकारातील पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
शेळ्या मेंढ्या घालून पीक नष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून असा प्रकार सतत घडत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या शेतीधोरणाविरोधात कुटुंबासहित इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. शिंगणे यांनी पोलिसांमार्फत राष्ट्रपतींकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.