स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळावं!

भारतीयांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे देश विकास साधू बघत आहेत; मात्र कष्ट करूनही बळीराजा अजूनही पारतंत्र्यात असल्याची स्थिती आहे.
Independence Day
Independence Day Agrowon

नाशिक : भारतीयांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य (Independence) मिळवून दिले. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे देश विकास साधू बघत आहेत; मात्र कष्ट करूनही बळीराजा अजूनही पारतंत्र्यात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘साहेब, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत शेतकऱ्याला स्वातंत्र्य (Freedom For Farmer) मिळायला हवं’, अशी मागणी करीत नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी (ता. देवळा) येथील शेतकरी माणिकराव निकम यांनी आपल्या कांदा (Onion) चाळीवर तिरंगा फडकावत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Independence Day
Tur : तुरीच्या साठ्याची माहिती द्या

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद दिसत नाही. तो अजूनही पारतंत्र्याचेच जीवन जगतो आहे. कष्टाने घाम गाळून पिकविलेल्या मालाला रास्त व किफायतशीर भाव नाही. कायम तोट्यातच शेती करायची. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून सातत्याने आंदोलन करुनही शासन कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Independence Day
Banana : केळीचे दर पडले की पाडले?

‘‘कांदा चाळच आमचे वैभव आहे. या कांद्यावरच आमचं पोटपाणी, मुलांचं शिक्षण, कुटुंबाचं आरोग्य अवलंबून आहे. यावर अनेक शेत मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र कांदा अजूनही सरकारी धोरणांच्या पारतंत्र्यात सापडला आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं, म्हणूनच कांदा चाळीवर तिरंगा फडकावला,’’ अशी भावना निकम व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा...

- अतिवृष्टीने अतोनात नुकसान होऊनही ते नियमात का बसत नाही?

- स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी का केली जात नाही?

- सरकार काही पिकांना किमान हमी आधारभूत किंमत घोषित करते. पण त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात तसा कडक कायदा मात्र बनवला जात नाही?

- कांद्याचे भाव पडल्यानंतर केंद्र सरकार धोरणात्मक निर्णय घेत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com