छत्र हरवलेल्या मुलीचे बच्चू कडूंनी केले कन्यादान

एक आक्रमक नेता म्हणून ओळख तयार झालेल्या बच्चू कडू यांच्यामध्ये हळवे मनही आहे, हे सोमवारी (ता.१३) जिल्ह्यात झालेल्या एका विवाहसोहळ्यात दिसून आले.
छत्र हरवलेल्या मुलीचे बच्चू कडूंनी केले कन्यादान
Bachchu KaduAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः एक आक्रमक नेता म्हणून ओळख तयार झालेल्या बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यामध्ये हळवे मनही आहे, हे सोमवारी (ता.१३) जिल्ह्यात झालेल्या एका विवाहसोहळ्यात दिसून आले. पितृछत्र हिरवलेल्या मुलीचे कन्यादान त्यांनी केले. या वेळी आक्रमक, आंदोलक, निडर भासणारे बच्चू कडू हळवे आणि भावुक झालेले दिसून आले.

बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील दुर्गा ही नववधू. तिचे वडील भास्करराव तराळे आणि आई प्रमिला दोघांचेही छत्र नाही. तिच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न यापूर्वी झाले होते. मेव्हणे व मामांनी मिळून दुर्गाच्या लग्नासाठी वर शोधला. कंचनपूर (ता. खामगाव, जि. बुलडाणा) येथील विलासराव बहुरूपी यांचे चिरंजीव प्रवीण यांच्या स्थळाचा होकार आला. दुर्गाचे लग्न करून देण्याचा प्रश्‍न होता. यासाठी बाळापूरजवळील मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत हे पुढे आले.

त्यांनी याची जबाबदारी घेतली. तर सोहळ्यात कन्यादानासाठी पालकमंत्री बच्चू कडू उपस्थित राहिले. वधुपित्याच्या भूमिकेत त्यांनी विधिवत पूजा करून जावई प्रवीण आणि कन्या दुर्गा यांचे पूजन केले. व्याही विलासराव यांच्याकडून दुर्गाला नीट सांभाळण्याचे अभिवचन घेतले. या विवाह सोहळ्यासाठी मुरलीधर राऊत, अमोल जामोदे, महेश आंबेकर, श्रीकांत धनोकार, अनिल गवई, पद्मजा मानकर, रमेश ठाकरे या सेवाभावींनी घरचे कार्य असल्याप्रमाणे जबाबदारी घेतली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com