पाळीव प्राण्यांच्या बाजारात प्रार्थना कीटकांची वाढतेय लोकप्रियता

शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध कारणाने प्राणी, पक्षी पाळले जातात. या पाळीव प्राण्यांची एक मोठी बाजारपेठ आहे. पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेमध्ये कुत्री, मांजरे आणि पक्ष्यांना कायम मोठी मागणी असते.
पाळीव प्राण्यांच्या बाजारात प्रार्थना कीटकांची वाढतेय लोकप्रियता
Pet InsectAgrowon

शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध कारणाने प्राणी, पक्षी पाळले जातात. या पाळीव प्राण्यांची (Pets) एक मोठी बाजारपेठ आहे. पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेमध्ये कुत्री, मांजरे आणि पक्ष्यांना (Bird Pets) कायम मोठी मागणी असते. मात्र अलीकडे प्रार्थना कीटकांची (Prarthana Insect) लोकप्रियता वेगाने वाढत असल्याचे पुढे आले आहे. पाळीव प्राण्याच्या बाजारपेठेसंदर्भात (Pet Market) नुकताच एक अहवाल प्रकाशित झाला असून, त्यात संधी आणि समस्यांचा ऊहापोह केला आहे. प्रार्थना कीटकांसंदर्भात सध्या कोणतेही नियम, कायदे उपलब्ध नाहीत. त्याचाही फायदा कीटकांच्या संवर्धकांसोबतच हौशी लोक घेताना दिसत आहेत.

एखाद्या कीटकाचे पालन हे आपल्याला काहीसे विचित्र वाटत असले, तरी जगभरातील हजारो लोक त्याकडे वळत असल्याचे चित्र आहे. हे किटक मॅण्टीस वर्गामध्ये येतात. त्यांचे ३३ कुळ असून, ४६० गणांमध्ये सुमारे २४०० जाती आहेत. त्यात अनेक प्रकार, आकार आणि रंग उपलब्ध आहेत. काही वाळलेल्या काड्यांप्रमाणे दिसत असले तरी काहीमध्ये फुलांसारखे विविध आकर्षक रंगही दिसून येतात. (उदा. ऑर्किड मॅण्टीस, Hymenopus coronatus). काही पोकेमानसारखे मजेशीर दिसतात. (उदा. ज्वेल्ड फ्लॉवर मॅण्टीस, Creobroter wahlbergii). काही आकाराने मोठे असून, आपल्या मोठ्या आणि मांजरीसारख्या डोळ्यांमुळे लोकांना आकर्षित करतात. (उदा. जायंट शील्ड मॅण्टीस, Rhombodera basalis).

इटली येथील रॉबेर्टो बॅटीस्टोन ऑफ म्युझियो डी आर्चिओलॉजिय इ सायन्स नॅचरली जी. झॅनोटो आणि विल्यम डी पिटरो ऑफ दि वर्ड बायोडायव्हर्सिटी असोसिएशन आणि अमेरिकेतील कीटकशास्त्र क्रिस अॅण्डरसन यांनी पहिल्यांदा मॅण्टीस पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेचा आढावा घेतला आहे. बाजारपेठेविषयी जाणून घेतानाच या सजिवांचा विविध जातीच्या संवर्धन, जागरूकता आणि त्यांच्या राहण्यासाठी आवश्यक परिस्थितिकी या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहे. हे सर्वेक्षण जर्नल ऑफ ऑर्थोप्टेरा रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सर्वेक्षणातील महत्त्वाचे...

- सर्वेक्षणासाठी मॅण्टीस विक्रेत्यामध्ये २०० हौशी, व्यावसायिक लोकांचा समावेश आहे. ते २८ वेगवेगळ्या देशातून कार्यरत आहेत.

-ग्राहकांमध्ये सामान्यतः १९ ते ३० वयोगटांतील आहेत. हे कीटक खरेदी करण्यामागे व्यक्तिगत आवड, कुतूहल आणि शास्त्रीय कल या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

- एका कीटकासाठी सुमारे ३० डॉलरपर्यंत खर्च केला जातो.

- दुर्मीळ कीटकांपेक्षा सुंदर दिसणाऱ्या कीटकांना त्यांचे प्राधान्य असते.

- यातून या कीटकांची जैवविविधता जोपासली जाणार आहे. मात्र सध्या यात कायदे आणि नियम यांची वानवा असल्यामुळे चारपैकी एक वेळा परवान्याची आणि पारदर्शकतेची समस्या जाणवते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com