
शाकाहारी लोकांच्या आहारात पांढऱ्या वांग्याची (White Brinjal) भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. वांग्याचे विविध प्रकार अढळतात. यामध्ये काटेरी हिरवी वांगी, भरताची वांगी, जांभळ्या रंगाची वांगी लोकप्रिय आहेत. वांग्यांच्या या प्रकारांमध्ये आता पांढऱ्या वांग्याची भऱ पडली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने पूसा व्हाईट ब्रींजल - १ (Pusa White Brinjal -1) हे पांढर्या वांग्याचे वाण विकसीत केले आहे. ही वांगी अगदी अंड्यांसारखी दिसतात. इतर रंगाच्या वांग्यापेक्षा या वांग्यामध्ये अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात, त्यामुळे बाजारपेठेत विशेषत: परदेशात या वांग्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे जम्मू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांतील शेतकऱ्यांचा कल पांढऱ्या वांग्याच्या लागवडीकडे वाढत आहे.
कमी वेळेत अधिक उत्पादन
पांढऱ्या वांग्याच्या रोपांची जलद वाढ होते. त्यामुळे लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसात फळे यायला सुरुवात होते. एका वांग्याचे वजन सुमारे ५० ते ६० ग्रॅमपर्यंत भरते.
एक हेक्टरमध्ये वांग्याची लागवड करण्यासाठी, २५० ग्रॅम बियाणे आवश्यक आहे. सुरुवातीला रोपवाटीकेत रोपे तयार करुन रोपांची मुख्य शेतात लागवड केली जाते.
पुर्ण वाढ झालेले वांगे अगदी अंड्यासारखे दिसते. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात खरीपात पांढऱ्या वांग्याची लागवड लागवड केली जाते. याशिवाय ज्या भागात वांग्याची लागवड होते त्या भागातही पांढऱ्या वांग्याची लागवड करता येते. पांढर्या वांग्याच्या लागवडीसाठी फेब्रुवारी आणि मार्च हा सर्वोत्तम काळ असतो. मात्र, भारतात अनेक ठिकाणी डिसेंबरच्या अखेरीसही त्याची रोपे लावली जातात. त्याचबरोबर जून-जुलैमध्येही या वांग्याची लागवड होते.
पांढऱ्या वांग्याचे पौष्टिक गुणधर्म
पांढऱ्या वांग्याचे सेवन केल्याने साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेहींसाठी पांढरी वांगी फायदेशीर ठरतात. याशिवाय खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी पांढरी वांगी फायदेशीर आहेत. वजन नियंत्रित राहते. पंचनाशी संबंधीत समस्यांवर पांढरे वांगे उपयुक्त आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.