Water Shortage In Jalgaon : पारोळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

Water Level Decrease : पारोळा तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. सद्यःस्थितीत चार गावांमधील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Jalgaon Water News : पारोळा तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. सद्यःस्थितीत चार गावांमधील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून, दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

उन्हाची तीव्रता अद्यापही कायम असल्याने नागरिकांनी पाण्याचा योग्य व जपून वापर करावा, असे आवाहन पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.

तालुक्यात एकूण ११४ खेडी असून, दरवर्षी उन्हाळ्यात काही ठरावीक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. काही वेळा पशुधनासाठी देखील पाणी जवळपास उपलब्ध नसते.

तालुक्यातील बऱ्याच गावांना पाण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यानंतर या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासते. त्यामुळे अशा गावांमधील ग्रामस्थांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी तालुका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Water Shortage
Water Shortage : ‘आठ दिवसांत तलाव भरून द्या, अन्यथा उपोषण करू’

सद्यःस्थितीत तालुक्यातील तामसवाडी धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय चार गावांतील विहिरी अधिग्रहण करून तेथील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.

तालुक्यातील खोलसर, कराडी, मोहाडी व पोपटनगर या चार गावांमधील ज्या विहिरींना सध्या चांगले पाणी आहे, त्या अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर हनुमंतखेडे व खेडीढोक या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

हनुमंतखेडे गावात तीन फेऱ्या, तर खेडीढोक येथे टँकरच्या दररोज चार फेऱ्या केल्या जात आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता संदीप सोनवणे यांनी दिली.

दरम्यान, महाळपूर (ता. पारोळा) येथील एका विहिरीच्या अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव आला असून, तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तालुक्याच्या ज्या गावांमध्ये पाणीटंचाई भासत असेल, तर अशा गावांनी प्रस्ताव पाठवावेत व पाण्याचा सर्वांनी जपून वापर करावा, असे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार लोंढे यांनी केले आहे.

धरणात अत्यल्प पाणीसाठा

तालुक्याला वरदान ठरलेल्या बोरी (तामसवाडी) धरणात सद्यःस्थितीत अत्यल्प पाणीसाठा आहे. बोरी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचे पाणलोट क्षेत्र ६३९.८ चौरस किलोमीटर असून, धरणाची पूर्ण पातळी क्षमता ४०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या धरणाची केवळ २६२.८३ मीटर पाण्याची पातळी आहे. धरणातून यापूर्वीच पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

त्यामुळे आता केवळ शहरवासीयांना पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही, तरी धरणातील उपलब्ध पाण्यावर पारोळेकरांची तहान सहज भागू शकते. मात्र तालुक्यातील टंचाईसदृश्‍य गावांचा पाणीप्रश्‍न दूर होण्यासाठी यावर्षीच्या पावसाळ्यात धरण क्षमतेने भरणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com