Water Management In Bhandara : भंडारा जिल्ह्याचा आराखडा सूक्ष्म नियोजनासह बनवावा

जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील दीड महिन्यात जास्तीत जास्त कामांना कृषी, जलसंपदा, वन यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी सुरुवात करावी.
Water Management
Water ManagementAgrowon

Bhandara News : जलयुक्त शिवारच्या (Jalyukat Shiwar) दुसऱ्या टप्प्यात पुढील दीड महिन्यात जास्तीत जास्त कामांना कृषी, जलसंपदा, वन यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणांनी सुरुवात करावी व हे अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कार्यशाळेच्या उद्‍घाटनाप्रसंगी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान २.० कार्यशाळेला कृषी अधीक्षक अधिकारी संगीता माने, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अनंत जगताप, उपवनसंरक्षक गवई उपस्थित होते. या वर्षी अल-निनोच्या भाकितामुळे व वातावरणातील बदलामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. मात्र जलजीवन मिशनअंतर्गत जलस्रोतांच्या बळकटीकरणाचे काम हे प्रथम प्राधान्य असावे, असे कुंभेजकर यांनी सांगितले.

Water Management
Jalyukat Shivar Yojana : जलयुक्त शिवार योजनेत ‘जलतारा’चा समावेश करू

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग घेतला होता. या टप्प्यातही भारतीय जैन सकल संघटना व अन्य अशासकीय संघटनाची मदत घेण्यात यावी. प्रत्येक तालुक्यात किमान पाच गावांत श्रमदानाने कामे करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरीत्या अंमलबजावणी करून जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृद्‍ व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन त्यांची यशस्वी अंमलबजावणी करून शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.

जलयुक्त शिवार अभियान १.० प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्यातील १०० गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

कार्यशाळेच्या उद्‍घाटकीय कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यांनी केले. या कार्यशाळेत सर्व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे कामाच्या नियोजनाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com