Pune Rain News Marathi: घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

या पावसामुळे भात खाचरे (Paddy Fields) भरून वाहत आहे. पाऊस उघडीप देत नसल्याने भात लागवड (Paddy Cultivation) काही प्रमाणात खोळंबल्याची स्थिती आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : जुलै महिन्यात पाऊस सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस होत आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २२२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पश्‍चिम भागातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे भात खाचरे (Paddy Fields) भरून वाहत आहे. पाऊस उघडीप देत नसल्याने भात लागवड (Paddy Cultivation) काही प्रमाणात खोळंबल्याची स्थिती आहे.

पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे खरिपातील पिकांसाठी (Kharip Crops) हा पाऊस पोषक असल्याने पिकांची वाढ जोमदार आहे. दहा ते पंधरा दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्याने काही प्रमाणात पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या लोणावळा या घाटमाथ्यावर १७६ मिलिमीटर पाऊस (Rainfall) पडला. तर वळवण या घाटमाथ्यावर १६२ मिलिमीटर, ठोकरवाडी १३६, शिरोटा येथे ६३ मिलिमीटर पाऊस (Rainfall) पडला.

Heavy Rain
Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

तसेच, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मिलिमीटर, वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०७ मिलिमीटर, पानशेत ८०, वरसगाव ८४, पवना ७५, कासारसाई ५१, कळमोडी ६८, चासकमान ५०, भामा आसखेड ४९, आंध्रा ५६, गुंजवणी ७१, नीरा देवघर ४९, पिंपळगाव जोगे ४९, माणिकडोह ५७, येडगाव ५३, डिंभे ७८, चिल्हेवाडीत ३१ मिलिमीटर पाऊस (Rainfall) पडला.

Heavy Rain
Rain Update : नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३२ मंडलांत अतिवृष्टी

तर भाटघर, वीर, वडज, घोड, विसापूर, उजनी, खडकवासला, शेटफळ आणि नाझरे या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) तुरळक सरी पडल्या. त्यामुळे मुठा खोऱ्यातील धरणांत चोवीस तासांत १.८४ टीएमसी, तर नीरा खोऱ्यातील धरणांत ३.२५ टीएमसी, कुकडी खोऱ्यातील धरणांत ३.६३ मिलिमीटर पाऊस पडला. एकूणच भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये १७.८६ टीएमसी पाणीसाठा (Water Storage) नव्याने दाखल झाला आहे.

Heavy Rain
Rain Updates: गडचिरोली जिल्ह्यातील २० मार्ग वाहतुकीसाठी बंद

एक जूनपासून आतापर्यंत धरणनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

टेमघर १,४१०, वरसगाव १,१५४, पानशेत १,१८९, खडकवासला ३२६, पवना १,२७४, कासारसाई ५२८, कळमोडी ८९३, चासकमान ५०३, भामा आसखेड ५०४, आंध्रा ६६४, वडिवळे १२४२, शेटफळ १४९, नाझरे १६३, गुंजवणी १,०७५, भाटघर ४४०, नीरा देवघर ९१५, वीर १५७, पिंपळगाव जोगे ६२९, माणिकडोह ७६९, येडगाव ४७४, वडज ३७५, डिंभे ५९३, चिल्हेवाडी ३३१, घोड ११५, विसापूर ४९, उजनी २६५, मुळशी २,८४३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com