Millet Man : भरडधान्याला ओळख देणाऱ्या 'मिलेट मॅन'ने घेतला अखेरचा श्वास

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला साथेस यांनी मित्रांच्या मदतीने डीडीएस संस्थेची झहीरबाद येथे सुरू केली.
Millet Man
Millet ManAgrowon

Millet : शाश्वत कृषी अन्नप्रणालीवर काम करून 'मिलेट मॅन' असा सन्मान पात्र पी व्हि साथेश (P V Sathesh) यांचे रविवारी सकाळी हैद्राबाद येथेत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्यावर पास्तापुर या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. साथेश डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीचे (डीडीएस) संस्थापक आणि कार्यकारी संचालक होते. तसेच त्यांनी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पास्तापुर येथे काम केले होते.

साथेश यांनी महिला गटाच्या माध्यमातून भरडधान्य लागवड आणि सेंद्रिय शेती यावर काम केले. तसेच या दोन विषयांवर काम करून कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मार्ग दाखवला.

देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये भरडधान्याचा समावेश करण्यास डीडीएस कारणीभूत आहे. त्यासाठी साथेश यांनी काही वर्षांपूर्वी महिला शेतकऱ्यांच्या मदतीने भरडधान्य पिकांचे वाटप सार्वजनिक व्यवस्थेतून यशस्वी करून दाखवली होती.

Millet Man
Millet Conference 2023 : भरडधान्याला ‘श्री अन्न’ म्हणून प्रोत्साहन

१८ जून १९४५ रोजी म्हैसूर येथे जन्म झाला. त्यांनी पेरियापटना वेंकटसुब्बय्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येथून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली.

तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशातील ग्रामीण विकास आणि ग्रामीण साक्षरतेशी संबंधित कार्यक्रम बनवून त्यांनी दूरदर्शनसाठी सुमारे दोन दशके एक अग्रणी दूरदर्शन निर्माता म्हणून काम केले.

१९७० च्या दशकातील ऐतिहासिक सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१९८० च्या दशकाच्या सुरुवातीला साथेस यांनी मित्रांच्या मदतीने डीडीएस संस्थेची झहीरबाद येथे सुरू केली. या संस्थेच्या मदतीने त्यांनी गावातली दलित महिलांना जमवून त्यांच्या पारंपारिक ज्ञानावर भर देऊन काम केल.

त्यामुळे जमिनीचा ऱ्हास, जैवविविधतेचे नुकसान रोखता आले. तसेच भूक आणि कुपोषणासारख्या समस्यांशी लढता आले.

Millet Man
Millet Crop : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भरडधान्यउत्पादक शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष

पी व्हि साथेस यांचे योगदान -

- एनजीओच्या मदतीने भरडधान्य पुनरुज्जीवन आणि संवर्धन

- कम्युनिटी रेडिओ स्टेशन, संघम रेडिओ

- ग्रामीण भागातील महिला सशक्ती आणि सक्षमीकरण

- तेलंगणातील ७५ गावांमधील हजारो गरीब महिलांचे जीवनमान सुधारण्यात यश

- मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया (MINI), साउथ अगेन्स्ट जेनेटिक इंजिनिअरिंग (SAGE), AP Coalition in Defence of Diversity यासारख्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे नेतृत्व

- SANFEC, अन्न, पर्यावरणशास्त्रासाठी दक्षिण आशियाई नेटवर्कचे भारत समन्वयक

- २०० हून अधिक पर्यावरणीय गटांसह पाच-देशांचे दक्षिण आशियाई नेटवर्क

- जेनेटिक रिसोर्सेस अॅक्शन इंटरनॅशनल (ग्रेन), बार्सिलोना, स्पेनचे बोर्ड सदस्य

- सस्टेनेबल फूड सिस्टम्स (IPES-फूड), ब्रसेल्स, बेल्जियमवरील तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलचे सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com