Abdul Sattar : कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मोबाईल नंबरवर कॉल लागेना, फोटोही पाठवता येईना

कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर केले असून शेतकऱ्यांनी नुकसान आणि वादळी पावसाची माहिती व फोटो नंबरवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Crop Damage : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी (Agriculture Minister Abdul Sattar) नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी नंबर जाहीर केले खरे परंतु त्यावर फोन लागत नाही. तसेच व्हॉटसअॅपवर फोटोही पाठवता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

सरकारने तातडीने यावर मार्ग काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आ. अनिल देशमुखांनी विधानसभेत केली.

कृषिमंत्री सत्तारांनी शनिवारी (ता.१८) नुकसान भरपाईची माहिती शेतकऱ्यांनी थेट कृषिविभागला पाठवण्याचे आवाहन केले. त्यासाठी सत्तारांनी वैयक्तिक मोबाइल नंबर जाहीर केला.

तसेच शासकीय निवासस्थानावरील संपर्क क्रमांक जाहीर केले होते. परंतु जाहीर केलेल्या नंबरवर कॉल लागत नाही. तसेच व्हॉटसअॅपवर मेसेज पाठवता येत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

Abdul Sattar
Abdul Sattar: अखेर कृषिमंत्र्यांनी केला नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा; तातडीने पंचनाम्याचे आदेश 

"कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नंबरवरून कॉल लागत नाही. व्हॉटसअॅपवर फोटो पाठवता येत नाही. काही फोटो पाठवता आले परंतु कसलाही प्रतिसाद मिळत नाही.

त्यामुळे काही अडचण असेल तर कृषी विभागाने ती सोडवावी. किंवा संपर्क क्रमांक बदलून द्यावेत." अशी मागणी देशमुख यांनी केली.

कृषिमंत्र्यांची नुसतीच स्टंटबाजी?

कृषिमंत्र्यांनी स्वत:च्या बंगल्यावरील आणि कार्यालयातील मोबाइल नंबर जाहीर केले असून शेतकऱ्यांनी नुकसान आणि वादळी पावसाची माहिती व फोटो नंबरवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले.

कृषिमंत्री सत्तारांनी ९४२२२०४३६७ मोबाईल क्रमांक व ०२२-२२८७६३४२, ०२२-२२८७५९३० अशी दोन कार्यालयातील संपर्क क्रमांक जाहीर केले. तसेच शासकीय निवासस्थानाचा ०२२-२२०२०४३३ नंबर जाहीर केला होता. परंतु या तीनही नंबरवर संपर्क साधला जात नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. यानिमित्ताने अनिल देशमुखांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

Abdul Sattar
Abdul sattar: शेतकऱ्यांनी कॉल करून नुकसानीची माहिती द्यावी; कृषिमंत्र्यांनी केला मोबाइल नंबर जाहीर

अॅग्रोवन डिजिटलने देशमुख यांच्या दाव्यातील सत्यता तपासण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी कॉल फॉरवर्ड केला जात होता. तसेच कार्यालय आणि निवासस्थानावरील नंबर सतत व्यस्त येत होते.

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांला आता सुलतानी चेष्टालाही सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा शेतकऱ्यांना बसतो आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com