National Animal : राष्ट्रीय प्राणी गाय नव्हे, वाघच!; सांस्कृतिक मंत्रालयानं केलं स्पष्ट

National Animal of India : रेड्डी म्हणाले, वाघ आणि मोराला वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १९७२ च्या अनूसूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या अधिकृत नोंदींमध्ये दीर्घ काळ या दोन्ही वन्यजीवांचा समावेश नव्हता.
National Animal
National AnimalAgrowon

Parliament Monsoon Session Updates : गायीला राष्ट्रीय प्राणी करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. तसेच भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ राहील तर मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी सोमवारी (ता.७) संसदेच्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केले.

अलीकडेच गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याबाबत चर्चा सुरू होती. याबाबत भाजप खासदार भगीरथ चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना रेड्डी बोलत होते.

रेड्डी म्हणाले, वाघ आणि मोराला वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा १९७२ च्या अनूसूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या अधिकृत नोंदींमध्ये दीर्घ काळ या दोन्ही वन्यजीवांचा समावेश नव्हता.

परंतु ३० मे २०११ पासून वाघ आणि मोर यांना अनुक्रमे राष्ट्रीय प्राणी आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिसूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारचा गाय प्राण्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा सरकारचा विचार नाही, असंही रेड्डी म्हणाले.

National Animal
Cow Milk Rate : गाय दूध दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, महामार्ग रोखला

भगीरथ चौधरी यांनी सांस्कृतिक मंत्रालयाला गौमातेला भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून ओळख देण्याचा सरकारचा हेतू आहे का? आणि रक्षतिरी प्राणी म्हणून संसदेत कायदा करून भारतीय सनातन संस्कृतीचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा विचार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता.

चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी यांनी स्पष्टपणे नकार दिला. रेड्डी म्हणाले, सरकारचा असा कोणताही विचार नाही. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या देशी जातींच्या विकास आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्था स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

जनावरांच्या स्थानिक जातींवर लक्ष केंद्रित करू. देशात गोकुळ मिशन राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे देशात जनावरांसह देशी जातींची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आहे. गाय आणि वासरांच्या संरक्षणासाठी विभागानं भारतीय प्राणी कल्याण मंडळाची स्थापना केली आहे."

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com