Mango Orchard : ‘मॅंगोनेट’वर नोंदणीकृत बागांची संख्या वाढली

देशातील उत्पादनक्षम आंबा बागेचे क्षेत्र २२ लाख ५८ हजार हेक्‍टर, तर राज्यातील क्षेत्र १ लाख ६७ हजार हेक्‍टर आहे.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon

Aurangabad News : निर्यातक्षम आंबा उत्पादनाकडे (Mango Production) शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ‘मॅंगोनेट’मध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेल्या नोंदणीवरून हे स्पष्ट झाले आहे.

यंदा मॅंगोनेटवर राज्यातील ९ हजार २६० तर देशातील १५ हजार ८४८ आंबा बागांची (Amba Baag) नोंद झाली आहे. ही बाब उत्साह वाढविणारी असून २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीची मुदत असल्याने यात आणखी भर पडणे अपेक्षित आहे.

देशातील उत्पादनक्षम आंबा (Mango) बागेचे क्षेत्र २२ लाख ५८ हजार हेक्‍टर, तर राज्यातील क्षेत्र १ लाख ६७ हजार हेक्‍टर आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाच्या धर्तीवर आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच अपेडाकडून मॅंगोनेटवर नोंदणी सुरू करण्यात आली.

जगाच्या एकूण आंबा क्षेत्राच्या ४१ टक्‍के क्षेत्र भारतात आहे. दुसरीकडे देशभरातील ९ आंबा वाणांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामध्ये राज्यात कोकणातील हापूस व मराठवाड्यातील केसर आंब्याला जीआय (भौगोलिक मानांकन) मिळाले आहे.

Mango Orchard
Mango Cultivation : अति घन आंबा लागवड करा

गतवर्षी मॅंगोनेटवर राज्यातून नोंदणीला प्रतिसाद देत जवळपास ७ हजार बागांची (प्रत्येकी १ हेक्‍टर) प्रमाणे शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदा राज्यातील हा आकडा ९२६० (प्रत्येकी १ हेक्‍टर) बागांच्या नोंदीवर पोहोचला आहे.

जीआय मानांकन मिळालेल्या विविध फळपिकांची अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंद करणाऱ्यांची संख्या देशात ९ हजार आहे. त्यामध्ये ७५०० महाराष्ट्रातील आहेत.

मराठवाड्यात भौगोलिक मानांकनासाठी निरुत्साह

भौगोलिक मानांकन मिळालेल्या कोकणातील हापूसच्या १४००, तर मराठवाड्यातील केसर आंब्याच्या केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांनीच भौगोलिक मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केली आहे.

भौगोलिक मानांकनाचा अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंद केली असल्यास दहा वर्षांचे प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्याला मिळते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यातीसाठी होतो.

परंतु अशाप्रकारे भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उपयोग निर्यात वा मूल्यवर्धनासाठी करून घेण्यात खासकरून मराठवाड्यातील केसर आंबा उत्पादकांचा उत्साह दिसत नाही.

जिल्हानिहाय मॅंगोनेट नोंदणी (प्रत्येकी १ हेक्‍टर प्रमाणे)

नगर ः ७२

औरंगाबाद ः ९

भंडारा ः ७

बुलडाणा ः १७

चंद्रपूर ः ३

गडचिरोली ः ५

गोंदिया ः १८

जळगाव ः १

जालना ः ७

लातूर ः ५

नंदूरबार ः २

नाशिक ः ३९४

उस्मानाबाद ः ६६

पालघर ः १९

परभणी ः २

पुणे ः १३६

रायगड ः ९७८

रत्नागिरी ः ४२२१

सांगली ः १३५

सातारा ः ३१

सिंधूदुर्ग ः १५९६

सोलापूर ः ९३

ठाणे ः १४४२

वाशीम ः १

राज्यनिहाय मॅंगोनेट नोंदणी

आंध्र प्रदेश ः २३०७, बिहार ः ३३०, गोवा ः २, गुजरात ः १५९४, कर्नाटक ः ३७०, केरळ ः २७ , महाराष्ट्र ः ९२६० तमिळनाडू ः १२७, तेलंगणा ः १३१३, उत्तर प्रदेश ः ५१८

आंबा उत्पादकांना भौगोलिक मानांकनाचे, मॅंगोनेटवर नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच निर्यातवाढीसाठीचे प्रयत्न केले जात आहेत. क्षेत्र जास्त असले तरी उत्पादकता कमी असणे ही समस्या आहे. शेतकरी मॅंगोनेटवर नोंदणीसाठी पुढे येत आहेत. त्यांची जागरूकता सातत्याने वाढत आहे, ही उत्साहवर्धक बाब आहे.
गोविंद हांडे, कृषी निर्यात सल्लागार, फलोत्पादन अभियान महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com