Chhagan Bhujbal : विकासकामांमध्ये दफ्तर दिरंगाई सहन करणार नाही

सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध योजनांतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, जलसिंचन, पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalAgrowon

Nashik News : मतदारसंघात सुरू असलेली विकासाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, विकासकामांमध्ये दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

भुजबळ यांनी रविवारी (ता. ५) येथील संपर्क कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध विकासकामांचा व योजनांचा आढावा घेतला. कांदा खरेदी बाबत सविस्तर चर्चा करून कांदा खरेदीचा आढावा घेतला.

Chhagan Bhujbal
Ashok Chavan : सीमा भागातील विकासकामे स्थगितीचा निर्णय मागे घ्या ः चव्हाण

तसेच मतदरसंघांतील रस्ते, महावितरणची कामे, पाणीटंचाई, जलसंधारण, पाणीपुरवठा योजना, रोजगार हमी, जलयुक्त शिवार, सहकार, कृषी विभागाच्या योजनांसह मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर आदींसह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध योजनांतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, जलसिंचन, पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. शहरात स्वच्छता व सुशोभिकरणाची कामे करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

तसेच आगारातील राहिलेली कामे, नवीन विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत अशा सूचना करत नाफेड कांदा खरेदी, कांद्याची होणारी आवक शिल्लक कांदा आणि येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सूचना त्यांनी केल्या.

Chhagan Bhujbal
Onion rate: कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा; नाफेड आणि एनसीसीएफला तातडीने लाल कांदा खरेदीचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता अभिजित शेलार, गणेश चौधरी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एम. कुलकर्णी, शाखा अभियंता राहुल भामरे, येवला पालिकेचे शहर अभियंता जनार्दन फुलारी, पाटबंधारे विभागाचे अमोल सुरडकर, अनिता सखदे, महावितरण विभागाचे अभियंता संदीप अस्वले, मिलिंद जाधव, आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे, वाहतूक निरीक्षक विकास वाहुल, फलोत्पादन अधिकारी हितेंद्र पगार, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, पांडुरंग राऊत, संतोष खैरनार, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com