Sugarcane Labourer : ऊसतोड कामगारांचा उघड्यावरचा संसार

उत्क्रांतीच्या अनेक अवस्थांमधून आजचा मानव निर्माण झाला. उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानव अनेक अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाला.
Sugarcane Labourer : ऊसतोड कामगारांचा उघड्यावरचा संसार

उत्क्रांतीच्या अनेक अवस्थांमधून आजचा मानव निर्माण झाला. उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानव अनेक अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाला. सर्व प्राण्यांमध्ये अत्यंत बुद्धिमान, स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर संपूर्ण जगावर राज्य करण्याची इच्छाशक्ती असणारा, स्वतःचे जीवन अधिकाधिक सुखमय करण्यासाठी धडपडणारा, नवनवीन शोध लावणारा असा हा मानव प्राणी आहे. पूर्वीच्या काळी जंगलात राहणारा मानव शेतीच्या शोधामुळे स्थानिक झाला.

अग्नी व चाकाच्या शोधाने मानवास नवी प्रेरणा दिली. एकाच जागी स्थानिक होऊन स्वतःची वस्ती वाढविली. स्वतःच्या निवाऱ्यासाठी अनेक प्रयोग केले. हवामानानुसार, स्थानानुसार, स्वतःच्या गरजेनुसार आणि स्वतःच्या स्टेट्सनुसार (आजची संकल्पना) निवारा बनविला. निसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्याच्या नादात आपण निसर्गापासून कधी दूर गेलो, हे कळलेच नाही.

Sugarcane Labourer : ऊसतोड कामगारांचा उघड्यावरचा संसार
Jalgaon Milk Association : दूध संघ निवडणुकीत नियमांची पायमल्ली

सगळीकडे सिमेंटची लहान-मोठी जंगले उभी राहिली. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बळावर स्वतःचे जीवन आरामदायी बनविण्यासाठी मानवाने हातपाय हालविले. जग जवळ आले. दुनिया मुठ्ठी में समा गई! पण माणूस मात्र माणसापासून दूर गेला. फ्लॅट सिस्टिम सुरू झाली. वन बीएचके, टू बीएचके, वगैरे वगैरे, दाराला कायमची कडी नव्हे लॉक आले, उंबरा त्याच्यासमोरच्या रांगोळीसहित गायब झाला.

या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट जाणवते की Virtual Technology च्या शोधामध्ये मग्न आपण, आपल्या विचाराने-आचाराने-कृतीने आभासी होत गेलो. हे एक बरे की, खेड्यामध्ये आज देखील काही प्रमाणात जुन्या पद्धतीची जीवनशैली दिसून येते. घरांचे विशिष्ट आकार, उंबरा, शेणाचा सडा त्यावरील रांगोळी या गोष्टी एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. हे जग वास्तव असते.

Sugarcane Labourer : ऊसतोड कामगारांचा उघड्यावरचा संसार
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहेत. त्यामुळे उसाच्या फडाच्या आसपासच्या मोकळ्या जागांवरती ऊसतोड कामगारांच्या झोपड्या उभ्या असलेल्या दिसतात. सहसा एका टोळीत आठ-दहा झोपड्या असतात. या ऊसतोड कामगारांचे काम अत्यंत कष्टदायक असते. तीव्र थंडी, ऊन आणि दिवसभर काम हिच त्यांची दिनचर्या आणि झोपडी हाच संसार असतो. या झोपडीतच हंगामाच्या चार-पाच महिन्यांकरिता जीवन जगण्याची आवश्यक साहित्य असते.

या झोपडीत आणि झोपडीच्या आसपासच त्यांचे जगणे असते. झोपडीचे आकारमान जर मोजायचे तर फूटपट्टी पुरेशी असते. एवढी लहान झोपडी आणि तिच्या आश्रयाने या ऊसतोड कामगारांच्या संसाराचा गाडा हाकला जातो. ऊन, वारा, पाऊस असो, थंडी किंवा गर्मी असो ही झोपडीच या कामगारांच्या कुटुंबाचा आधार व ओळख असते. या झोपडीत राहणाऱ्या माणसांना सुरक्षिततेसाठी लॉक लावायची, सीसीटीव्ही लावायची गरज पडत नाही किंवा एसी, पंखा याची सोय करावी लागत नाही.

Sugarcane Labourer : ऊसतोड कामगारांचा उघड्यावरचा संसार
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

आपले काम आणि त्याला मिळणारा दाम हेच त्याचे भांडवल असते. खूप कष्ट, हलाखीचे जगणे असले, तरी त्यावाचून दुसरा पर्याय नसतो. काम केले तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या चार-पाच महिन्यांच्या कष्टाच्या मोबदल्यातच संपूर्ण कुटुंब आलेला दिवस आनंदाने, कोणतीही किरकिर न करता व्यतीत करीत असतात.

ज्यावेळी गाळप हंगाम बंद होतात आणि ऊसतोड कामगार आपल्या ‘मूळ’ घराकडे परतत असतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद नक्कीच दिसून येतो. हा उघड्यावरचा संसार काही दिवस तरी दाराच्या आड बंद होणार असतो. आणि याच आनंदाच्या दोन-चार दिवसानंतर पुढच्या वर्षीच्या तयारीला लागायचे असते.

- पै. माउली नागनाथ हेगडे,

सामाजिक कार्यकर्ते. मु. पो. हराळवाडी,

ता. मोहोळ, जि. सोलापूर (९०११६१६११५)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com