मनाची परवानगी...!

शाळेत असताना आणि व्यवहारातही आपण सर्वांनी एक सुविचार नक्कीच वाचला आहे. किमानपक्षी तो ऐकला तर आहेच आहे.
Success
Success Agrowon

राजेंद्र उगले

शाळेत असताना आणि व्यवहारातही आपण सर्वांनी एक सुविचार नक्कीच वाचला आहे. किमानपक्षी तो ऐकला तर आहेच आहे. तो म्हणजे, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ आयुष्यभर आपण फिरत असतो या ‘यश’ आणि ‘अपयशाच्या’ चरख्यात! आपली होते पिळवणूक आणि भरडले जातो आपण यात. यश हे मृगजळ (mirage) बनून दिसत असते समोर आणि आपण न थांबता, न थकता करत असतो याचा पाठलाग.

पाणी समजून जवळ गेल्यावर समजते आपल्याला की जे भागवू शकेल आपली तहान; ते नाहीच आहे हे पाणी. मग आपण पुन्हा धावतो पुढच्या टप्प्यावर. अजून पुढच्या टप्प्यावर. यात होतेच आपली दमछाक पण नकळतपणे चढून होतात आपल्याकडून अपयशाचे हे डोंगर. लोक बघतात आपल्याकडे कुतूहलाने. काही समजतात आपल्याला वेडे वगैरे. तर काही करतात आपली थट्टा.

Success
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

याही भाऊगर्दीत काही असतात आपल्या बाजूचे आणि त्यांना वाटत असते आपल्याबद्दल कणव. ते देत असतात अधून-मधून धीर आणि सांगत असतात आपल्या कानात- ‘बस आता अजून थोडं... हे आलंच तुला अपेक्षित ठिकाण.’ थकलेल्या आपल्या शरीराला त्यामुळे मिळते ऊर्जा. आपल्या देहात भरले जातात अगणित सकारात्मकतेचे भाव आणि आपण पुन्हा होतो ताजेतवाने पुढच्या प्रवासासाठी!

हा पुढचा प्रवास दरवेळी आपल्याला आणखी घेऊन जातो आपल्या इच्छिताच्या समीप. एक दिवस चढून होतो आपल्याकडून आपल्याच अपेक्षांचा हा भला मोठा डोंगर. त्या डोंगराच्या वरच्या टोकावर उभे असतो आपण एकटेच. डोंगराच्या माथ्यावर आपला भरभक्कम पाय रोवून. आपल्याला नसते भान किती खरचटले याचे.

Success
Sugar Price : साखरेच्या दरावर परिणाम होणार का ? | ॲग्रोवन

आपल्याला नसते भान यात किती झाली आपली दमछाक. आपल्याला नसते उसंत आपल्या थकलेल्या शरीराकडे बघण्यासाठी. चेहऱ्यावर विजयाचे भाव घेऊन उभे असतो आपण दोन्ही हात आकाशाला कवेत घेण्याच्या मुद्रेत. आकाश अजूनही असते आपल्यापासून कोसो दूर पण तरीही असतो आपल्या चेहऱ्यावर आनंद, डोंगर सर केल्याचा. आपल्या दिग्विजयचा!

जगण्याच्या या लढाईत येते आपल्या लक्षात-यश हे अगदीच असते सोपे. कारण ते असते कशाच्यातरी तुलनेत. यशस्वी होऊनही हिरमुसतो आपण तेव्हा कोणीतरी हलकेच ठेवतो आपल्या खांद्यावर हात आणि सांगतो हळूच- ‘यश मिळवता येते परिश्रमाने पण समाधान मात्र असते महाकठीण. हे मिळवण्यासाठी लागते आपल्या मनाची परवानगी!’ आपण येतो भानावर आणि डोकावतो आपल्या आत... मन हसत राहते आपल्या असमाधानी वृत्तीवर!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com