सरकार अस्थिर करण्याचा डाव जनता हाणून पाडणार

बाळासाहेब थोरात ः राज्य सरकारकडून उत्तम काम
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratAgrowon

नगर ः अनेक नैसर्गिक संकटांना (Natural Calamities) तोंड देत राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government) अडीच वर्षे केवळ टिकलेच नाही, तर उत्तम काम करीत आहे. हे न देखवणाऱ्या व केवळ प्रसिद्धीसाठी हपापलेल्या काही प्रवृत्ती राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा कांगावा करीत राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहेत. मात्र जनता भाजपचा डाव हाणून पाडणार, असा विश्‍वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथे सोमवारी (ता. २५) प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या नाट्यात दोषी असलेले सापडतील. कोणी गोंधळ घातला, हे जनतेला समजते आहे. शिवसैनिकांना भडकावण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र त्यांनी अद्यापही खूप संयमी धोरण स्वीकारले आहे. या सर्व प्रकारांत शिवसैनिकांकडून काही चूक झाली असे मला तरी वाटत नाही. भाजपला नैराश्य आलेले आहे. आमच्या सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. त्यांनी वर्तवलेले सर्व अंदाज फोल ठरले. राज्यातील भोंग्यांबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, की याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करणे ही राज्याची जबाबदारी आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्ट निवेदन केल्याने वेगळे बोलण्याची आवश्यकता नाही. मात्र राज्यघटनेच्या तत्त्वाचा, समतेच्या तत्त्वांचा आमचा भोंगा सर्वांत मोठ्या आवाजाचा राहील, याची आम्ही काळजी घेऊ. आमचे तीन पक्षांचे सरकार असले, तरी आपापल्या पक्षाची चांगली वाढ करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, आम्ही ती करतो आहोत. त्याचा परिणाम म्हणून भाजपची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यांची खरी चिडचिड तीच आहे.

महाराष्ट्र विकासदरात वरच्या क्रमांकावर

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालानुसार देशातील राज्यांची अर्थव्यवस्था व विकासदराच्या तुलनेत महाराष्ट्राचा इतरांच्या तुलनेत वरचा क्रमांक आहे. अनेक नैसर्गिक संकटे व कोविडच्या संकटातही विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. अर्थव्यवस्था भक्कमपणे सांभाळणे, हे चांगल्या सरकारचे लक्षण असून, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे या वेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com