Polylactic Acid : जेजुरीत साकारतोय ‘प्राज’चा ‘पॉलिलॅक्टिक अॅसिड’ प्रकल्प

प्लॅस्टिकचे संकट रोखण्यासाठी बायोप्रिझम मंचावरील बायोप्लास्टिक तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Polylactic Acid
Polylactic AcidAgrowon

Pune News : ‘‘हवामान बदलाला कारणीभूत कार्बोत्सर्ग कमी करण्यासाठी ‘आरसीएम’च्या रूपात शाश्वत पर्याय ‘प्राज’ विकसित करत आहे. पॉलिलॅक्टिक अॅसिडच्या (पीएलए) रूपात बायोप्लॅस्टिकची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या बायोप्लॅस्टिकच्या तंत्रज्ञानाचा व्यापारी हेतूने वापर होण्यासाठी गती मिळावी, या साठी जेजुरी येथे पॉलिलॅक्टिक अॅसिडचा पथदर्शी प्रकल्प उभारत आहे,’’ अशी माहिती ‘प्राज’चे इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी दिली.

प्राज इंडस्ट्रीजने ४० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने कंपनीने केलेल्या वाटचालीच्या आढाव्यासंबंधी बुधवारी (ता.२२) पत्रकार परिषद आयोजित केली होती.

या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, मुख्य वित्तीय अधिकारी सचिन रावळे आदी उपस्थित होते.

Polylactic Acid
Pune APMC : पुणे बाजार समितीच्या अतिरिक्त करवसुलीला स्थगिती

चौधरी म्हणाले, ‘‘प्लॅस्टिकचे संकट रोखण्यासाठी बायोप्रिझम मंचावरील बायोप्लास्टिक तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकल्पामुळे अन्नपदार्थामध्ये वापरता येणारे लॅक्टिक अॅसिड आणि पॉलिलॅक्टिक अॅसिड यांचे उत्पादन या पथदर्शी प्रकल्पातून केले जाईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.’’

‘‘जागतिक हवामान बदलाची दखल व्यावसायिक स्तराबरोबरच सामाजिक स्तरावरही घेण्यासाठी कंपनी काम करत आहे.

त्यामुळे मुळशी (पुणे) तालुक्यातील मांदेडे हे गाव कर्बभाररहीत आणि हवामान बदलांना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकणारे गाव म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे.

त्यासाठी गोखले इस्टिट्यूटमधील राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विभागाची मदत घेण्यात येईल. गावपातळीवरील हरितगृह वायूंच्या उत्सर्गावर जैवआधारित पर्याय शोधून हा उत्सर्ग कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे,’’ असेही चौधरी यांनी सांगितले.

Polylactic Acid
Sunflower Crop : सूर्यफूल पिकाकडे पुणे विभागात दुर्लक्ष

हवामान बदलामुळे जगभरातील विमा कंपनीचे वार्षिक शंभर अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होत आहे. जैव अर्थव्यवस्थेला चालना हा हवामान बदलावरील शाश्वत उपाय महत्त्वाचा आहे.

अशी जैव अर्थव्यवस्था उभी राहावी, यासाठी अक्षय रसायने व जिन्नस (रिन्युएबल केमिकल्स अँड मटेरिअल्स-आरसीएम) आणि जैवइंधने या दोन्ही बाबतीत कंपनीने काम केले आहे.

आता हवामान बदलांविषयी वाढती जागृती आणि जगभरातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गरजा यात कंपनीसाठी अनेक व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

संशोधन व विकास ते आरेखन या कार्यवाही अशी संपूर्ण व्यवसायसाखळी उपलब्ध करून देणे हे आमचे वैशिष्ट्ये आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आणि व्यवसाय हाताळण्याची क्षमता आणखी वाढवण्यामध्ये आम्ही गुंतवणूक करत आहोत, असे चौधरी म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com