मनाची शक्ती

आपल्या आयुष्यात कुठलाही प्रसंग येवो सगळ्यात आधी त्याचा मनावर परिणाम होतो. आपण घडलेली, घडणारी गोष्ट सकारात्मकतेने घेतो, की नकारात्मकतेने यावर आपली मनाची शक्ती कशी आहे हे ठरते.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

ज्योती आधाट-तुपे

आपल्या आयुष्यात कुठलाही प्रसंग येवो सगळ्यात आधी त्याचा मनावर परिणाम होतो. आपण घडलेली, घडणारी गोष्ट सकारात्मकतेने घेतो, की नकारात्मकतेने यावर आपली मनाची शक्ती कशी आहे हे ठरते. गोष्ट खूप साधी असते. पण कधी कधी ती मनात खोलवर जाऊन त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम घडतात. आयुष्यात जे जसं आहे तसं स्वीकारलं की दुःख होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की परिस्थिती स्वीकारणे म्हणजे आनंदाचा मार्ग. आणि अस्वीकार दुःखाचे कारण आहे. आपल्या सर्व धर्मग्रंथांचा एकच सार आहे. समोर आलेल्या परिस्थितीला स्थिरतेने स्वीकारा.

मशागत लेख
Fig : पुरंदरच्या अंजिराचं मूळ अफगाणिस्तानात

एखाद्या व्यक्तीला बदलवताना आपण बदल घडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो. म्हणून जसं आहे तसं स्वीकारलं, की मन शांत आणि आनंदी राहतं. चेहऱ्‍यावरचं हास्य हे अंतर्मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आतून आनंद झालेला असला की आपोआप चेहराही खुललेला असतो. ओढूनताणून हसणारी माणसे आपण पाहतो. पण त्यांचा चेहरा हा खोट्या हास्यामुळे विकृत वाटतो. त्या खोट्या हसण्याने नकारात्मकता वाढते. म्हणून आपण स्वतः ठरवायचं, की हसू हे नैसर्गिक आहे. त्याला कृत्रिम नाही बनवायचं.

मशागत लेख
Horticulture : कष्ट, एकी, प्रयोगशीलतेतून फलोत्पादनात प्रगती

जे आहे ते आहे, जे जसं आहे तसं हे मानण्याची सवय लागली, की आपोआप जीवनात आनंद येतो. अन्यथा, जर आपली मानसिक स्थिती सतत हे माझ्याच आयुष्यात का घडलं, असं व्हायला नको होतं. आता मी काय करू? अशा अवस्थेत असेल तर मग जीवन रटाळवाणं वाटतं. समोर सुखाचा सागर जरी असेल तरी आपले मन त्याला दुःखात परावर्तित केल्याशिवाय राहत नाही. आयुष्यात येणारी वेळ कधीच स्थिर नसते, ती बदलणारी असते.

आपल्याला माहिती आहे, की बदल हा निसर्गाचा नियम आहे. मग हा नियम आपण समजून घेऊयात. आपण जसा विचार करणार आहोत तसंच आपल्या आयुष्यात घडत जातं. एखादी अपवादात्मक घटना असते. त्या घटनेचा आपण विचार केलेला नसतो. तरी ती आपल्या आयुष्यात घडते. पण असे एखादेवेळीच होते. आपल्याला जर हा नियम माहिती आहे तर मग का आपण नकारात्मकतेकडे ओढले जातो. याचे एकमेव कारण आपली मानसिक स्थिती. मनात आपण त्या गोष्टीबाबत आधीच विचार करून ठेवल्यामुळे ती तशीच घडते. आपण जर सकाळी उठल्याबरोबर म्हणालो, की माझा आजचा दिवस सुंदर जाणार आहे. तर नक्कीच आपला दिवस सुंदर गेलेला असेल. कारण तो आनंद आपण उठल्या क्षणी घेतलेला असतो. मनाची शक्ती जाणून घेऊन जीवनाचा आनंद घेऊया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com