Shrutika Bagul : श्रुतिकाच्या संशोधनाची पंतप्रधानांनाही भुरळ

नागपूर दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये श्रुतिका बागूल हिच्या संशोधनाची दखल घेऊन कौतुकही केले.
Shrutika Bagul
Shrutika Bagul Agrowon

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः अपघातानंतर पीएचडी अर्धवट सोडावी लागली तरीही संशोधनात्मक कार्याचा वसा नागपूरमधील श्रुतिका बागूल (Shrutika Bagul ) यांनी सोडला नाही. देशी गाईचे शेण आणि वनौषधींचा वापर करून संशोधनांती तिने सेंद्रिय खत उत्पादन केले आहे. फूल आणि फळगळ नियंत्रणासाठी या खताचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका कार्यक्रमामध्ये श्रुतिका बागूल हिच्या संशोधनाची दखल घेऊन कौतुकही केले.


Shrutika Bagul
बहारीनला भारतीय आंब्यांची भुरळ

श्रुतिकाचे वडील रमेश ढाकूलकर हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळात अभियंता पदावर होते.आई कालिंदी या गृहिणी आहेत. पुणे विद्यापीठातून एमएससी (बायोकेमेस्ट्री) पर्यंत शिक्षण केल्यानंतर श्रुतिकाची पुणे विद्यापीठ आणि भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून पीएचडीसाठी निवड झाली होती. २००८ मध्ये संशोधनात्मक थीसिस तपासणीसाठी घेऊन जात असताना श्रुतिकाच्या डोक्‍यावर नारळाची झावळी पडल्याने मोठी दुखापत झाली. परिणामी, अर्ध्यावरच पीएचडी सोडावी लागली.

या दरम्यान श्रुतिकाची आई कालिंदी ढाकूलकर यांनी कारंजा (जि. वर्धा) येथे विठुराया गोशाळेची उभारणी केली. या गोशाळेत गवळाऊ गाईंची संख्या सर्वाधिक आहे. गोशाळेतील गाईंचे शेण आणि जंगल, शेतीच्या बांधावर सहज उपलब्ध होणाऱ्या वनौषधी तसेच उपयुक्त वनस्पतींचा वापर करून एका संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून श्रुतिकाने सेंद्रिय खत उत्पादन सुरू केले. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त विद्राव्य सेंद्रिय खताची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे.

Shrutika Bagul
भारतीय लाल मिरचीची जगाला भुरळ

या उत्पादनांचे भात, फळबागांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. या उत्पादनांच्या विकासासाठी स्टार्टअप इंडिया सीड फंडिंगमधून २५ लाख रुपयांचा निधी मिळाला. श्रुतिकाने २०२१ मध्ये सप्तरंग रिसर्च ॲण्ड ऑरगॅनिक प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून उत्पादनांचा व्यावसायिक स्तरावर विस्तार केला जाणार आहे. श्रुतिकाला संशोधनामध्ये आई कालिंदी ढाकूलकर, भाऊ डॉ. अमित त्यासोबतच भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधील तज्ज्ञ डॉ. शरद पवार तसेच इनफेड-आयआयएम, नागपूर येथील डॉ. शिवाजी धवड यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Shrutika Bagul
आंबा पिकासाठी संशोधनाची गरज

पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असताना मेट्रो प्रवासात इनफेड-आयआयएम, नागपूर यांच्या माध्यमातून श्रुतिकाला त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पंतप्रधानांनी उत्सुकतेने तिच्या या संशोधन कार्याची माहिती घेतली. हुरूप वाढलेल्या श्रुतिकाने व्यावसायिक पातळीवर प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com