Agricultural Pump : शेतीपंप विजेचा प्रश्‍न कायम अधांतरी

करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकीच्या कारणामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केलेला आहे.
Agricultural Pump
Agricultural PumpAgrowon

Solapur News : पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव (Bajarbhav) मिळत नाही, सतत हवामान बदलाचा (Change Weather) परिणाम उत्पन्नावर होतो आहे, त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी शेतीपंपाची वीज (Electricity) तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.

कोणतेही सरकार येऊ द्या, ते शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसते, हाच अनुभव शेतकरी सध्या घेत आहेत. शेतीपंपाचे वीज कनेक्शन बंद केले जात असतानाच शेतकऱ्यांबरोबरच गावठाणातील वीज ग्राहकही यामध्ये भरडला जात असून, महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

हिवाळ्याबरोबरच उन्हाळाही जोर धरू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन बंद केले जात आहेत.

त्यामुळे उभी पिके धोक्यात आली आहेत. करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकीच्या कारणामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित केलेला आहे.

Agricultural Pump
Agriculture Electricity : शेती वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास आंदोलन

वीजपुरवठा खंडित केल्यानंतर गावठाण शेजारी शेतकरी तारांवर आकडे टाकून शेतीपंप सुरू करत आहेत. त्यामुळे गाव डीपीवर ताण वाढून ट्रान्सफॉर्मर जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दिवसभरात गावठाणातील वीज वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थ वैतागून गेले आहेत.

करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच वीजतोडणी त्वरित बंद करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.

करमाळा तालुक्यात शेतीपंपाची सुमारे ४०० कोटींच्या आसपास थकबाकी आहे. वरिष्ठांच्या आदेशानेच वीजबिल वसुलीसाठी शेतीपंपाचे कनेक्शन सोडविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी चालू बिल भरल्यास तत्काळ कनेक्शन चालू करून देण्यात येतील. त्यामुळे त्या त्या ट्रान्स्फॉर्मरवरील शेतकऱ्यांनी वीजबिल भरून सहकार्य करावे. महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत असल्यामुळे वीज वसुली करण्यात येत आहे; तसेच शेतकऱ्यांनीही महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. जे शेतकरी वीजबिल भरत आहेत, त्यांचा वीजपुरवठा लगेच सुरळीत केला जात आहे.
सुमीत जाधव, कार्यकारी अभियंता, महावितरण, करमाळा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com