Water organization : गावांना पाणीदार करणारी ‘वॉटर’ नावाच्या संस्थेची कहाणी

वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वाॅटर) संस्थेचे राज्यात, देशातच नव्हे तर जगात नाव आहे. पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेतले.
Water organization
Water organizationAgrowon

वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वाॅटर) (Watershade Orginisation Trust) संस्थेचे राज्यात, देशातच नव्हे तर जगात नाव आहे. पाणलोट चळवळीचे आधारवड फादर हर्मन बाखर (Harman Bakhar) यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. दुष्काळावर मात करायची असेल, तर दुष्काळी खेड्यांमध्ये जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत, असे त्यांनी ठरवले.

त्यासाठी जर्मन सरकारची मदत घेतली. त्यांनी १९८९ मध्ये सहकारी क्रिस्पिनो लोबो यांच्यासोबत महाराष्ट्रात इन्डो- जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची रचना केली. जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्यामध्ये द्विपक्षीय करार होऊन नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

Water organization
Lumpy Skin : राज्यात ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणात

त्याआधी फादर बाखर यांनी १९६९ मध्ये श्रीरामपूरला सोशल सेंटरची स्थापना केली होती. जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देऊन त्यातून शेती विकास करण्याला प्राधान्य दिले. विविध शेती योजनांतून शेतकऱ्यांना एक कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले. त्यातून १० हजार ८९२ एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. तीन हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली. १९९० पासून इंडो-जर्मन पाणलोट कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम राबविण्याची संपूर्ण जबाबदारी गावावर टाकण्यात आली. देशात पहिल्यांदाच असं घडलं होतं. पाणलोट कामाचा संपूर्ण निधी गावाच्या पाणलोट समितीला देण्यात आला.

Water organization
Rural Development : ग्रामपंचायत सक्षमीकरणामुळे गावांचा सर्वांगीण विकास

फादर बाखर यांनी क्रिस्पिनो लोबो यांच्या समवेत वॉटर या संस्थेची स्थापना १९९३ मध्ये केली. नाबार्ड आणि वॉटरकडे इंडो-जर्मन पाणलोट कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी होती. फादर बाखर यांनी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविताना वन खात्याबरोबर सामंजस्य करार केला. त्यामुळे माथा ते पायथा पाणलोटाचे उपचार करीत असताना माथ्यावरील वन खात्याच्या जमिनीवर ग्रामस्थांच्या सहभागाने वनीकरणाचे उपचार करण्याबाबत देशात पहिल्यांदाच परवानगी देण्यात आली. त्यानुसार इंडो-जर्मन प्रकल्पातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्रामध्ये उपचाराची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण झाली.

फादर बाखर यांनी संगमनेर, अकोले तालुक्यांत पाणलोटाच्या एकात्मिक विकासासाठी राबविलेला कार्यक्रम ‘संगमनेर पॅटर्न’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श गणला गेला. संस्थेचे संस्थापक फादर हर्मन वाखर यांचे १४ सप्टेंबर २०२१ रोजी स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. आता संस्थेचे सहसंस्थापक क्रिस्पिनो लोबो हे संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त म्हणून काम पाहत आहेत.

आतापर्यत राज्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर काम झाले. आजही ‘वाॅटर’चे १५३ संस्थांसोबत काम सुरू आहे. ‘वाॅटर’ने हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी परिसंस्था आधारित समायोजन (Ecosystem based Adaptation) हा महत्त्वाचा दृष्टिकोन अंगीकारला आहे...

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com