Rice Procurement : जळगावात धान्य महोत्सवाची वेळ चुकली, नियोजनातही गडबड

जळगाव जिल्ह्यात गहू, दादर ज्वारीची मळणी करून त्याची विक्रीही कमाल किंवा गरजू शेतकऱ्यांनी केली.
Rice
Rice Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात गहू, दादर ज्वारीची मळणी करून त्याची विक्रीही कमाल किंवा गरजू शेतकऱ्यांनी केली. गरजवंतांकडे धान्य नसताना आता कृषी विभागाने जळगाव शुक्रवारपासून (ता. २८) ते रविवारपर्यंत (ता. ३०) जळगाव शहरात शिवतीर्थ मैदानावर धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे.

मागील वर्षी कोविडमुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. यंदा त्याचे आयोजन केले. पण त्याची वेळ व नियोजनातही गडबड किंवा त्रुटी दिसत आहेत. अर्थात, शासकीय हवामान यंत्रणांनी उष्णतेची लाट, पाऊस, गारपिटीचे अंदाज व्यक्त केले.

पण हे अंदाज दुर्लक्षित करून हा महोत्सव आयोजित केला आहे. त्यात सध्या जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचे वातावरण आहे.

Rice
Rice Farming : कासा परिसरात उन्हाळी भातशेती फुलली

बुधवारीच जामनेर तालुक्यात गारपिटीने धुमाकूळ केला. पीकहानी झाली. पण याकडे दुर्लक्ष करून महोत्सवातील स्टॉल, त्यातील साहित्याच्या संरक्षणासाठी निधीची तरतूद केलेली नाही. ८० स्टॉल या महोत्सवात लावले जाणार आहेत.

जळगाव शहरापासून चाळीसगाव, भडगाव हे तालुके मोठ्या अंतरावर आहेत. चाळीसगाव तर तब्बल १०० किलोमीटर अंतरावर आहे. रावेर, मुक्ताईनगरमधील अनेक गावेदेखील ८० ते १००० किलोमीटर अंतरावर आहे. पण याचा विचार आयोजन करताना केलेला नाही.

महोत्सवाचे उद्‍घाटनदेखील मंत्री, अधिकाऱ्यांची वेळ, त्यांची सवड लक्षात घेऊन निश्‍चित केले असून, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता उद्‍घाटन होणार आहे.

ताडपत्रीची व्यवस्था स्वतःच करा

पाऊस, गारपीट झाल्यास धान्य, पदार्थांच्या संरक्षणासाठी ताडपत्रीची व्यवस्था प्रशासन किंवा कृषी विभागाने केलेली नाही. ताडपत्री शेतकरी, संबंधित स्टॉलधारकांनी स्वतः घरून किंवा आपल्या स्तरावर आणावी, अशा सूचना कृषी कर्मचाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती मिळाली.

Rice
Rice Farming : पेणमधील हजारो एकर भातशेती पाण्यात
धान्य महोत्सवात सहभागी अधिकारी, शेतकरी व इतर सर्वांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. गारपीट, पावसाचे वातावरण आहे. त्यासाठी ताडपत्रीची गरज भासू शकते. पण ताडपत्रीसंबंधी निधीची तरतूद नाही. यामुळे ताडपत्री सहभागी शेतकरी किंवा स्टॉलधारकांना आणण्याचे सांगितले आहे.
संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com