Wrestling Competition : कुस्ती विजेत्यास मिळणार अर्धा किलो सोन्याची गदा

Maharashtra Wrestling : छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा २० ते २३ एप्रिलदरम्यान शहरातील वाडिया पार्क मैदानावर रंगणार आहे.
Kusti Competition
Kusti CompetitionAgrowon

Nagar News : छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा २० ते २३ एप्रिलदरम्यान शहरातील वाडिया पार्क मैदानावर रंगणार आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने कुस्त्यांचा थरार नगरकरांसह कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. विजेत्यास अर्धा किलो सोन्याची गदा (किंमत सुमारे ३५ लाख) देण्यात येणार आहे.

भाजप, शिवसेना व नगर जिल्हा तालीम संघाने कुस्ती स्पर्धेबाबत माहिती दिली. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अर्धा किलो सोन्याची गदा विजेत्यास मिळणार आहे.

द्वितीय विजेत्यास दोन लाख व तृतीय क्रमांकास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. ही स्पर्धा माती व गादी विभागात ४८, ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६ किलो वजन गटात होणार आहे.

Kusti Competition
Indian Wrestling : दंगल : आखाडा ते जंतरमंतर

अंतिम छत्रपती शिवराय केसरी खुला गट सोन्याच्या गदेसाठी ८६ ते १३५ किलो वजनगटात रंगणार आहे.

४८, ५७, ६१, ६५, ७०, ७४ या वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या मल्लांना अनुक्रमे एक लाख, पन्नास हजार व तीस हजार रुपये तसेच ७९, ८६ किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकांच्या मल्लांना अनुक्रमे एक लाख २५ हजार, ७५ हजार व ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रा. राम शिंदे आहेत.

पैलवानाचे आकर्षण

नगर येथे होणाऱ्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत तब्बल दहा महाराष्ट्र केसरी उतरणार आहेत. सिकंदर शेख, माउली कोकाटे, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर, महेंद्र गायकवाड, बाला रफीक यांच्यासह जिल्ह्यातील नामवंत मल्ल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com