Women ST Bus Service Concession : शासनाच्या सवलती उदंड, मात्र बससेवाच नाही

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच बस प्रवाशांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र दोन महामार्गावर असूनही डोंगरकिन्ही येथून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बस बंद झाल्याने प्रवाशांना या सवलतीचा फारसा फायदा होत नाही.
Women ST Bus Concession
Women ST Bus ConcessionAgrowon

Beed News : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच बस प्रवाशांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र दोन महामार्गावर असूनही डोंगरकिन्ही येथून सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या बस बंद झाल्याने प्रवाशांना या सवलतीचा फारसा फायदा होत नाही.

प्रशासनाने याची दखल घेत लांब पल्ल्याच्या बस सुरू कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डोंगरकिन्ही येथे पूर्वी रस्ते अरुंद होते व पक्केही नव्हते. त्या काळात कोपरगाव व बारामती येथून मुक्कामी बस येथे येत होत्या. मुंबईला येथून थेट बस होती.

मात्र आता डोंगरकिन्ही गाव दोन महामार्गावर आले आहे. तरीही बीड-कल्याण व पाटोदा-मुंबई या बस शिवाय येथून दुसऱ्या लांब पल्ल्याच्या बस नाहीत. त्यामुळे बारामती व कोपरगाव या मुक्कामी बस परत सुरू करण्यात याव्यात असे नागरिकांते म्हणणे आहे.

Women ST Bus Concession
Women ST Bus Concession : महिलांचे अर्धे तिकीट एसटीसाठी ठरले संजीवनी

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडला जाण्यासाठी सकाळी नऊ वाजेनंतर चार वाजेपर्यंत बस नाही. बीडसाठी फेरा गाडी सुरु करण्याची आवश्यकता आहे.

साखर कारखाने, औद्योगिक शहर, तीर्थक्षेत्र व दवाखाना यासाठी नेहमी प्रवासी संख्या असणाऱ्या ही बस सुरु करण्याची मागणी आहे.

कोरोना काळात बंद पडलेल्या पाटोदा आगाराच्या बहुतेक बस सुरु झाल्या आहेत. इतर नवीन बसची मागणी येईल तसा विभागीय कार्यालयाकडे व इतर जिल्ह्यातील आगाराच्या बससाठी संबंधित विभागीय नियंत्रकाकडे पाठपुरावा केला जाईल.
अमोल भुसारी, आगार व्यवस्थापक, पाटोदा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com