Weather Update : एल निनोची सध्या भीती नाही...

येत्‍या २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या आठवड्यात किमान तापमानात हळूवारपणे वाढ होत जाईल. त्‍यामुळे सकाळी हवामान थंड राहील.
Weather Update
Weather UpdateAgrowon

L Nino Weather Update : एल निनोमुळे (El Nino) येत्‍या मॉन्सूनवर (Monsoon) परिणाम होईल व भारतात दुष्काळ (Drought) पडेल, अशा बातम्‍या येत आहेत. मात्र जून ते सप्‍टेंबर या कालावधीत एल निनो सामान्य राहणार असून, त्‍याचा फार मोठा प्रभाव येत्‍या मॉन्सूनवर होणार नाही. त्‍यामुळे त्याची भीती घेण्याचे कारण नाही.

माझ्या मॉन्सून मॉडेलचा (Monsoon Model) अंदाज मार्च ते मे या कालावधीतील हवामानावर आधारित असतो. महाराष्ट्रातील १५ स्‍थानिकातील हवामानाची आकडेवारी (Weather Statistic) प्राप्त झाल्‍यानंतर आणि ती १५ स्‍थानिकांचे प्रारूपामध्ये भरल्‍यानंतर २५ ते २६ मे रोजी आपला मॉन्सून पावसाचा म्हणजेच जून ते सप्‍टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज तयार होतो.

तो १ जून रोजी प्रकाशित केला जातो. त्‍या वेळी आपणास संपूर्ण महाराष्ट्रासह भारताचेही चित्र स्‍पष्ट होते. तेव्‍हा एल निनोची सध्या भीती बाळगण्याचे कारण दिसत नाही.

येत्‍या २६ फेब्रुवारी ते ४ मार्च या आठवड्यात किमान तापमानात हळूवारपणे वाढ होत जाईल. त्‍यामुळे सकाळी हवामान थंड राहील. मात्र सूर्याचे उत्तरायण सुरू असल्‍याने दिवसाचा कालावधी या पुढे झपाट्याने वाढत जाईल. दुपारी हवामान उष्ण राहील.

ही स्‍थिती कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात राहील. कमाल तापमानात वाढ होण्याचा वेग विदर्भात अधिक राहील. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्‍सिअसपर्यंत तर गडचिरोली जिल्‍ह्यात ते ४० अंश सेल्‍सिअसपर्यंत वाढणे शक्‍य आहे.

अशा तापमान वाढीमुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल आणि हवामान अत्‍यंत कोरडे राहील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल, त्‍यामुळे पिकांची, मानवाची, जनावरांची आणि पक्ष्यांची पाण्याची गरज वाढेल.

Weather Update
ला निनामुळे मान्सून प्रभावित

१. कोकण - सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्‍सिअस राहील. रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्‍सिअस राहील. रत्‍नागिरी व रायगड जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्‍सिअस राहील, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते २१ अंश सेल्‍सिअस राहील.

ठाणे व पालघर जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्‍सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड ठाणे व पालघर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्‍के, रत्‍नागिरी जिल्ह्यात ७६ टक्‍के, रायगड जिल्ह्यात ४२ टक्‍के, ठाणे व पालघर येथे २५ टक्‍के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात ३६ टक्‍के, रत्‍नागिरी जिल्ह्यात २८ टक्‍के, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ११ ते १५ टक्‍के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. प्रति तास आणि दिशा अग्नेय व ईशान्येकडून राहील.

२. उत्तर महाराष्ट्र - नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्‍सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्‍सिअस, तर जळगाव जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्‍सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन जळगाव जिल्ह्यात १६ टक्‍के, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १८ ते १९ टक्‍के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बहुतांश सर्वच जिल्ह्यात अत्‍यंत कमी म्‍हणजे ७ ते ९ टक्के‍ राहील.

नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी राहील, तर धुळे नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५ कि.मी. राहील. नाशिक व जळगाव जिल्‍ह्यात नैर्ऋत्येकडून वारे वाहतील.

३. मराठवाडा - कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३६ अंश सेल्‍सिअस, तर जालना, परभणी, बीड, लातूर व उस्‍मानाबाद या जिल्ह्यात ३७ अंश सेल्‍सिअस आणि नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ३८ अंश सेल्‍सिअस राहील.

मराठवाड्यातील हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्‍सिअस, तर उस्‍मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्‍मानाबाद लातूर व नांदेड जिल्ह्यात २२ ते २५ टक्‍के, तर बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात १४ ते१६ टक्‍के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता उस्‍मानाबाद व लातूर जिल्ह्यात ११ टक्‍के, तर नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ७ ते ९ टक्‍के राहील.

हवामान अत्‍यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून, तर वाऱ्याचा ताशी वेग उस्‍मानाबाद व लातूर जिल्ह्यात १२ ते १३ कि.मी. व उर्वरित जिल्ह्यात ६ ते ९ कि.मी. राहील.

४. पश्चिम विदर्भ - कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३७ अंश सेल्‍सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्‍सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता केवळ ७ टक्‍के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

Weather Update
Monsoon : ‘मॉन्सून’च्या पावसावर ‘एल निनो’ प्रभाव ठरवणे घाईचे

५. मध्य विदर्भ - कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ३७ अंश सेल्‍सिअस, यवतमाळ जिल्ह्यात ३८ अंश सेल्‍सिअस आणि नागपूर जिल्ह्यात ३९ अंश सेल्‍सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्‍सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १७ ते २० टक्‍के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्क‍े राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. आणि वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.

६. पूर्व विदर्भ - कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ४० अंश सेल्‍सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३९ अंश सेल्‍सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १८ अंश सेल्‍सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ३९ टक्‍के, तर भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात २२ ते २५ टक्‍के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात केवळ ७ ते ९ टक्‍के इतकी कमी राहील.

हवामान अत्‍यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील व वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.

७. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - कमाल तापमान कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यात ३६ अंश सेल्‍सिअस, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यात ३७ अंश सेल्‍सिअस राहील. किमान तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात १९ अंश सेल्‍सिअस राहील. आकाश अंशतः सर्वच जिल्ह्यात ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७३ टक्‍के, तर सांगली व सातारा जिल्ह्यात ४० ते ४७ टक्‍के आणि सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात १८ ते २३ टक्‍के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १७ टक्के‍ इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्‍ला ः

१. आंबा बागेत प्रत्‍येक झाडांला १०० लिटर पाणी प्रत्‍येक आठवड्यात द्यावे.

२. नारळाचे झाडांना प्रति झाड प्रति आठवडा १०० लिटर पाणी द्यावे.

३. कुक्कुटपालन शेडमध्ये पाणी भरलेल्‍या भांड्यांची संख्या वाढवावी.

४. जनावरांना दिवसातून ३ ते ४ वेळा स्‍वच्‍छ पाणी पिण्यास द्यावे.

५. उन्हाळी, बाजरी, तीळ, ज्‍वारी, सूर्यफूल, भुईमूग, कलिंगड, भेंडी या पिकांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याची पाळी (प्रत्‍येक ८ दिवसांनी) द्यावी.

६. फळबागांना ८ दिवसांनी पाणी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com