Rose Market : गुलाबाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांची निराशा

पॉलिहाउसमधील गुलाबाला व्हॅलेंटाइन डे बाजारासाठी विशेष मागणी असते. मात्र या यंदा दराने फटका दिला आहे.
Rose Market
Rose MarketAgrowon

Nashik Rose Rate : सण उत्सव, लग्नसराई (Wedding) आणि ‘व्हॅलेंटाइन डे’ (Valentine's Day) मार्केटसाठी लाल गुलाबांची विशेष मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गुलाब उत्पादक (Rose Producer) छाटणीसह उत्पादनाचे नियोजन करत असतात. एकीकडे गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुलाबाची मागणी नसल्याने दरात घसरण झाली होती.

त्यानंतर २०२२ वर्षात काहीअंशी दरात दिलासा मिळाला. मात्र यंदा फूल उत्पादकांना उत्पन्नाची अपेक्षा असताना मार्केटने निराशा केली आहे. व्हॅलेंटाइन डे बाजारासाठी प्रतिफुलामागे २ रुपये दराची तफावत राहिली. परिणामी, गुलाबाची लाली फिकी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मोठी गुंतवणूक करून जिल्ह्यातील शेतकरी संरक्षित शेतीमध्ये पॉलिहाउस उभारून गुलाबाची शेती करत आहेत.

पॉलिहाउसमधील (Poly House) गुलाबाला व्हॅलेंटाइन डे बाजारासाठी विशेष मागणी असते. मात्र या यंदा दराने फटका दिला आहे. एकीकडे दरात अस्थिरता असल्याने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी लागवडी कमी केल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी हे क्षेत्र जिद्दीने टिकवून ठेवले आहे.

यंदा व्हॅलेंटाइन डेच्या बाजारपेठेत ‘टॉप सिक्रेट’ व ‘बोर्डेक्स’ या वाणाच्या दांडीसहित गुलाबाची मागणी स्थिर होती. त्यामुळे नियोजन करून उत्पादन घेतल्यानंतरही अपेक्षित परतावा मिळू शकलेला नाही.

Rose Market
Valentine's Day 2023 : गुलाब निर्यातीत भारतीय गुलाबांना केनीयाशी स्पर्धा| ॲग्रोवन

जिल्ह्यात जानोरी, मोहाडी, आडगाव, मखमलाबाद, वासाळी, नांदूर, तपोवन आदी परिसरांत २०० एकरांमध्ये गुलाबाच्या पॉलिहाउसमध्ये लागवडी आहेत.

यापूर्वी शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा तोटा सोसल्यानंतर पॉलिहाउसमधील लागवडी उपटून टाकल्या. परिणामी, मागणीच्या तुलनेत फुलांची उपलब्धता कमी असतानाही व्यापाऱ्यांकडून मागणी स्थिर राहिली. व्हॅलेंटाइन डेच्या बाजारात फुलांना उठाव मर्यादित असल्याने दराअभावी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

दरामुळे शेतकरी निराश

लाल रंग, लांब दांडी यांसह हिरवी पाने यावर दर ठरतो. त्यामुळे ८ रुपयांपासून ते १५ रुपयांपर्यंत प्रति फुलाला दर मिळतो. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फुलांच्या काढणीस सुरुवात होते. हा माल दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशसह मुंबईत पाठविण्यात येतो.

मात्र मुंबई बाजारात मागणी कमी दिसून आली. अनेक व्यापाऱ्यांनी शीतगृहात फुले साठविल्याने दर दबावात राहिले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

गुलाब दर स्थिती (रुपयांत) :

वर्ष..किमान. कमाल...सरासरी

२०२१... ५.... १०...८

२०२२...८... १५....१२

२०२३...७.. .१३...१०

दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मागणी काही अंशी कमी झाल्याने नियोजन करूनही अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे चालू वर्षी व्हॅलेंटाइन डे बाजारात उत्पन्नात घट आली आहे. हे वर्ष दरासाठी निराशाजनक ठरले.
धीरज जेजुरकर, गुलाब उत्पादक, तपोवन शिवार, नाशिक
मागणी वाढेल अशी अपेक्षा होती. त्यानुसार फेब्रुवारीपासून दर वाढतील, असे वाटत होते. मात्र बाजारात तसे झाले नाही. ११ फेब्रुवारी नंतरही मागणी स्थिर असल्याने दरात फायदा झाला नाही.
सुनील मौले, गुलाब उत्पादक, मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com