Nashik Crop Damage : शासकीय यंत्रणा बांधावर न पोहोचल्याने पंचनामे नाहीच

राज्य कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर पंचनाम्यांना वेग आला. त्यामुळे पुढे अधिक नुकसान समोर येणार असल्याची शक्यता होती.
Crop Damage News
Crop Damage NewsAgrowon

Nashik Crop Damage Update : नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह १५ ते १९ मार्च दरम्यान गारपीटीच्या तडाख्यात द्राक्ष, आंबा, कांदा, गहू, भाजीपाला पिकांचे असे ७ हजार ७२० हेक्टरवर मोठे नुकसान झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी निफाड व चांदवड तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. त्यावर शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्या. अनेक भागांत पंचनामे झाले. मात्र असे असतानाही जिल्ह्यात अनेक शेतकरी अद्याप पंचनाम्यांपासून वंचित आहेत.

कृषी व महसूल विभागाच्या (Agriculture, Revenue Department) यंत्रणांकडे संपर्क करण्यात आला, मात्र मुदत संपली, आता प्रशासनाकडे अहवाल सादर झाला, असे कारण कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी दिले. मात्र आता पंचनामे न झाल्याने मदतीपासून शेतकरी वंचित आहेत.

कृषिमंत्री सत्तार यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत व्यथा जाणून घेतल्या. नुकसानीचे मला गांभीर्य असून मुख्यमंत्र्यांसमोर परिस्थिती मांडणार, असे आश्वासन दिले होते.

Crop Damage News
Crop Damage Fund Demand Parbhani : पीक नुकसान मदतीसाठी ४ कोटींवर निधीची मागणी

राज्य कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर पंचनाम्यांना वेग आला. त्यामुळे पुढे अधिक नुकसान समोर येणार असल्याची शक्यता होती. पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मार्चअखेर पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती.

मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर यंत्रणा पोहोचलेली नसल्याची स्थिती आहे. सरकारला गांभीर्य आहे; मात्र यंत्रणांनी त्याकडे काणाडोळा का केला, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

द्राक्ष पिकात मोठे नुकसान आहे. द्राक्षमण्यांना तडे गेल्याने व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नाही. काही ठिकाणी खरेदी कवडीमोल दराने झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच उत्पन्न पडलेले नाही.

त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. असे असताना नुकसानीचे पंचनामे होऊन दोन पैशांची मदत मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पंचनामे होत नसल्याने पाणी फिरते की काय, अशीच परिस्थिती आहे.

पंचनामे करण्यास टाळाटाळ

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या यंत्रणाकडे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली. मात्र तुम्ही आमच्याकडे का आले नाही, आम्ही व्हॉट्सॲपवर याबाबत सूचना केली होती. तुम्ही आमच्याकडे यायला हवे होते. असे उत्तर देऊन पंचनामे करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांनी कळविलेले मुद्दे :

 १)  पंचनामे नाही किंवा सुरुवातदेखील झालेली नाही.

  २) बहुतांश पंचनामे जागेवर बसून केले जात आहेत.

  ३) ठराविक शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; मात्र नुकसान असतानाही आमच्याकडे अद्याप कोणी आले नाही.

  ४) एक ते दोन दिवसांतच ठराविक शेतकऱ्यांचे धावतीवर पंचनामे झाले.

  ५) गहू काळा पडला, द्राक्षांचे नुकसान होऊन बांधावर आले नाही. आम्हाला न्याय मिळावा.

  ६) आणखी बरेचसे पंचनामे बाकी असून शहानिशा कृषी अधिकाऱ्यांकडून होत नाही.

Crop Damage News
Unseasonal Rain & Crop Damage : अवकाळीचा २०० हेक्टरवरील पिकांना फटका
पावसामुळे द्राक्षांना तडे जाऊन घडांची सड झाली आहे. मात्र कृषी व महसूल विभागाकडून गावात एका जागेवर बसून पंचनामे करण्यात आले. मी अपंग शेतकरी असून मला जाता आलेले नाही. आम्ही पाठपुरावा करत आहोत तर पंचनामे होत नाही. त्यामुळे पंचनामे व्हावे ही सरकारकडे आमची मागणी आहे.
विजय दौंड, द्राक्ष उत्पादक शेतकरी, लोणवाडी, ता. निफाड.
शासकीय यंत्रणांमार्फत जे पंचनामे झाले आहेत, ते पिकाची नासाडी किंवा झालेली नुकसान पाहून न होता गावातील प्रतिष्ठित माणसांची तोंडे पाहून झाले आहेत. प्रत्यक्षात जो गरीब आणि वंचित शेतकरी आहे त्यांचे पंचनामे झालेले नाहीत.
गणेश चव्हाण, शेतकरी,उगाव, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com