काडीकचरा शेतीत मुरवणारे युग येईल

देशाच्या कापूस क्रांतीमध्ये हातभार असलेल्या संशोधकांच्या यादीत डॉ. विजय वाघमारे यांचाही समावेश करावा लागेल. भारतीय कापूस संशोधन संस्थेचे (सीआयसीआर) संचालकपद भूषवून ते याच संस्थेच्या पीक सुधारणा विभागाचे प्रमुखपद सध्या सांभाळत आहेत. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील शेती कुटुंबात राहून शिक्षणाची साधने नसतानाही जिद्दीने ते नागपूर कृषी महाविद्यालयाचे कृषी पदवीधर बनले. त्यांनी पुढे भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर पदवी व जनुकीयशास्त्रात आचार्य पदवी मिळवली. गेल्या २९ वर्षांपासून केवळ कापूस या एकाच विषयात सलग संशोधन करणारे ते देशातील सध्याचे ज्येष्ठ कापूस शास्त्रज्ञ आहेत.
Agriculture Residue
Agriculture Residue Agrowon

वाढती लोकसंख्या, जागतिक हवामानातील बदल (Climate Change) आणि पाण्याची टंचाई (Water Shortage) अशा तीन मुख्य आव्हानांचा सामना भविष्यातील शेतीला करावा लागणार आहे. अन्नधान्याची मागणी (Food Demand) वाढत राहील. त्याचबरोबर फळे आणि भाजीपाला शेतीचाही विस्तार होणार असल्याने भविष्यातील शेती ही केवळ खरीप आणि रब्बी अशा हंगामाभोवती केंद्रित न राहता बारमाही होईल.

अर्थात, त्यासाठी आधुनिक कृषी प्रणाली आणि सिंचन व्यवस्थेची मदत मोलाची ठरेल. पाणी असल्यास कुठेही, कोणतेही आणि कधीही पीक घेता येते. त्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादनाची शेती हे भविष्यातील कृषी व्यवस्थेचे ध्येय असेल.

ठिबकमुळे कमी पाण्यात शेती फुलते; पण पाणीच नसेल तर शेतीत हजार समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी पाणी कसे उपलब्ध होईल, याभोवती कृषी वैज्ञानिक केंद्रित होतील. बारमाही कालावधीत बहुपीक पद्धती कशी विकसीत होईल, याकडे संशोधनाचा कल राहील. अन्नधान्याची शेती शक्य नसलेले भूभाग भविष्यात फळपिकांकडे वळतील.

Agriculture Residue
Onion Cultivation : खरीप, लेट खरीप कांदा लागवडीत घट

माझ्या मते फळबागाच नव्हे तर सर्वच पिकांमध्ये भविष्यात अतिघनदाट लागवड (हायडेन्सिटी प्लांटेशन्स्) किंवा पेरा याला महत्त्व येईल. तुमच्या एक लक्षात येईल, की सध्या फळबागांमधील झाडे कमी उंचीची कशी असतील व त्याला जास्त फळे कशी येतील, याकडे कृषी शास्त्रज्ञांचा भर आहे. त्यामुळे सहज तोडणी करता येईल, अशा पद्धतीनेच फळझाडांना उत्क्रांत करण्याकडे शास्त्रज्ञांचा कल राहील.

कारण झाडाची उंची कमी असल्यास फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सिंचन आणि तोडणी अशी सर्व कामे सहज करता येतात हे आता जगाच्या ध्यानात आलेले आहे. त्यामुळे भविष्याची फळशेती ही अतिघनदाट लागवडीची पण कमी उंचीच्या झाडांची आणि जास्त उत्पादन देणारी असेल.

Agriculture Residue
Farmer : मोठे शेतकरी खरेच धनदांडगे आहेत का?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचा म्हणजेच ‘ओसी’चा (ऑर्गेनिक कार्बन) आहे. कितीही संशोधन केले आणि कशाही जाती तयार केल्या तरी जमिनीचा ओसी वाढल्याशिवाय मोठे व्यापारी कृषी उत्पादन घेता येत नाही, हे आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविणारे धोरण स्वीकारले जाईल.

जमिनीची सुपीकता वाढवणारा सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे जमिनीचे कुपोषण कमी करणे. जमिनीचे पोषण केवळ कुजलेला काडीकचरा मिळाल्यामुळेच थांबते. कंपोस्ट मिळाले तर जमिनीत जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. त्यातून कोणतीही मृत जमीन पुन्हा सजीव होते. शेवटी जमीन ही दगडापासून तयार होते.

Agriculture Residue
Crop Damage : गव्यांच्या कळपांकडून आजऱ्यात पीक नुकसान

त्यात जिवंतपणा केवळ जिवाणूंमुळे येतो. शेतीतला काडीकचरा जोपर्यंत शेतीत मुरत नाही तोपर्यंत जिवाणूंची संख्या वाढणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधील काडीकचरा नाश करण्यापासून, तो जाळण्यापासून परावृत्त करणारे धोरण स्वीकारले जाईल. पाणी अडवा पाणी जिरवा, अशी हाक देत जलसंधारणाचा पाया रचला गेला. तसेच, काडीकचरा अडवा-काडीकचरा जिरवा, अशी नवी संकल्पना उदयाला येईल.

शेतकऱ्यांनी आत्तापासून शेतातील प्रत्येक काडीला शेतातच मुरवायला शिकले पाहिजे. कारण, तेच जमिनीचे अन्न आहे. ते वाया जाता कामा नये. धुऱ्यावरचे गवत आपण कापतो, फेकतो किंवा जाळून टाकतो, ते खरे तर तुमच्या शेताचे अन्न आहे. या गवताला तुमच्या शेतातच मुरवायला हवे. तुमच्या शेतात मुरलेल्या कोणत्याही काडीकचऱ्याने किंवा सेंद्रिय पदार्थाच्या अस्तित्वातून शेताचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे.

त्यामुळेच तण व्यवस्थापनाला भविष्यात खूप महत्त्व येईल. तण जाळून टाकणे, फेकून देणे किंवा तणनाशकाचा वापर करून नष्ट करण्यापेक्षा ते गोळा करून शेताला अन्न म्हणून दिल्यास जमिनीची सुदृढता वाढणार आहे. तण दिसले की कर नष्ट हा उपाय नाही. त्यामुळे समस्या तात्पुरती मिटते.

परंतु त्यामुळे जमिनीचे पोषण करणारा मोठा घटक आपण नष्ट करतो हे आपल्या धान्यात येत नाही. १४० कोटीच्या पुढे देशाची लोकसंख्या गेली आहे. मात्र शहरीकरणात चांगली शेतजमीन नष्ट होते आहे. केवळ शेतीलायक नसलेल्या जमिनींवरच नवी शहरे किंवा कारखाने वसवणारे धोरणदेखील भविष्यात आकाराला येऊ शकते.

(शब्दांकन ः मनोज कापडे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com