Shahada Market Committee Election : शहाद्यात निवडणूक होणारच, माघार नाही

सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताची व कल्याणाची निवडणूक असून, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही विचारांची लढाई आहे.
Shahada Apmc Election
Shahada Apmc ElectionAgrowon

Shahada Election Update : सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताची व कल्याणाची निवडणूक असून, शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही विचारांची लढाई आहे.

कोणत्याही परिस्थितीत निवडणूक होणार म्हणजे होणारच, यात माघार नाही, असे म्हणत जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

मोतीलाल व अभिजीत हे पाटील पितापुत्र आणि भाजपचे दीपक पाटील हे पारंपरिक विरोधात मानले जातात. मोतीलाल पाटील हे भाजपतर्फे शहादा पालिकेत प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीसंदर्भात म्हसावद (ता. शहादा) येथे झालेल्या सहविचार सभेत अभिजीत पाटील बोलत होते.

या वेळी शहाद्याचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, नामदेव पटले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुरेश नाईक, पंचायत समिती सदस्य सत्येन वळवी, रवींद्र पाटील, बुधा चित्ते, जगदीश पाटील, सत्यानंद पाटील, माधव पाटील, कपिल पाटील, भानुदास पाटील, आनंद पाटील, दिलीप गांगुर्डे, शिवाजी पाटील आदींसह उमेदवार, विविध गावांतील सरपंच, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

Shahada Apmc Election
Shahada Apmc Election : शहादा बाजार समिती निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी पदाधिकारी ठाम

या वेळी पाटील म्हणाले, की तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वेळा मध्य प्रदेशातील खेतिया तसेच जिल्ह्याबाहेर माल विक्रीसाठी जावे लागते. मोठ्या प्रमाणावर मार्केट कमिटीची जागा असून, त्यात पुरेशा सुविधा नाहीत.

माल विक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांना रात्र रात्र उघड्यावर झोपावे लागते. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या निवडणुकीत काही मंडळींकडून विनाकारण राजकारण केले जात आहे. राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांच्या संस्थेला राजकीय वळण लागू नये हे महत्त्वाचे परंतु त्यात राजकारण आल्याचे दुर्दैव असल्याची खंत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची सेवा हाच खरा धर्म पाळून बाजार समितीत कार्य करणे गरजेचे आहे. तालुक्यात दूध संघासारखे सहकार तत्त्वावरील प्रकल्प बंद पडले आहेत. मतदारांनी भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com