Kharif Season : यंदा दिवाळीनंतर शिवारात सीतादही

यंदा परतीचा पाऊस लांबल्याने कपाशीचा हंगामही लांबला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी येणारे पांढरे सोने यंदा दिवाळीनंतर येत आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

आर्णी, जि. यवतमाळ : यंदा परतीचा पाऊस (rain)लांबल्याने कपाशीचा हंगामही (Kharif Season) लांबला. दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी येणारे पांढरे सोने यंदा दिवाळीनंतर येत आहे. दिवाळीनंतर शेतकरी शेतशिवारात सीतादही करून कापूस वेचणीला प्रारंभ करीत आहेत. पांढरे सोने निघायला सुरू झाले असून, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी संघर्षमय राहिला. सर्वच नक्षत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे नदीनाल्यांना मोठे पूर गेले. नदीकाठावरील जमीन खरडून गेली. तर सतत पाऊस पडल्याने जमिनी चिबडल्या. सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने पार झोडपून काढल्याने नुकसान झाले. त्याचा परिणाम कपाशीवरही झाला. परंतु, दिवाळीनंतर पावसाने उसंत देताच शेतात कपाशीची बोंडे तडतड फुटू लागली.

Kharif Season
Kharif Season : एका महिन्यातील पावसानेच खरीप पिकांची माती

त्यातून कापूस बाहेर पडू लागला. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सीतादही करून कापूस वेचणीला आरंभ केला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीचा पेरा सोयाबीनपेक्षा जास्त होता. हे वर्षे कपाशी पिकासाठी दिलासा देणारे ठरले. सततच्या पावसामुळे निंदण व फवारणीच्या खर्चातही वाढ झाली. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे कपाशीचे पीक जोमात आहे. सध्या शेतशिवारात सीतादही करून कपाशी वेचणीला प्रारंभ झाला आहे.

पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा

विदर्भातील कळंब येथे कापसाचा शोध लागला आहे. कदंब ऋषींनी कपाशीचा शोध लावल्याचे पुराणात वर्णन आहे. त्यामुळे विदर्भाला कापसाचे क्षेत्र समजले जाते. कापूस वेचण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करूनच कापूस वेचणी केली जाते. त्याला सीतादही असे म्हणतात. शेतात दहीभाताचे बोनं शिंपडले जाते.

पऱ्हाटीच्या दोन झाडांमुळे पाळणा बांधून त्यात कापूस ठेवून धरणी मातेची पूजा केली जाते. हा कापूस वर्षभर पूजेच्या वातीसाठी वापरला जातो. यावेळी मातेची ओटी भरली जाते. दूध मडक्याच्या भांड्यात ठेवून तापवले जाते. ते शेतात सर्वत्र शिंपडले जाते. ज्या दिशेने दूध उतू जाईल त्या दिशेने कापूस वेचणीला आरंभ केला जातो. सध्या हे चित्र शेतशिवारात सर्वत्र दिसत आहे.

माझी आजी कपाशी पिकाची सितादही पूजन करत होत्या. ही पूजनाची परंपरा आज ही सुरू असून मी सन १९९९ पासून कपाशी पिकात पूजन करत आहे. पूजनाशिवाय कपाशी वेचणी केल्या जात नाही.गजानन लोनसणे, प्रगतिशील शेतकरी, आर्णी आमची वीस एकर शेती असून सितादही पूजन केल्याशिवाय आजपर्यंत कापूस वेचणी केली नाही. सितादही पूजनाची परंपरा आज रोजी ही कामय आहे.

- दिल्लशाद सय्यद, शेतकरी, आर्णी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com