
Crop Loan Parbhani News : यंदाच्या वर्षी (२०२३-२४) जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप व रब्बी हंगामात मिळून एकूण १ हजार ९२९ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात खरिपातील १ हजार २६४ कोटी ४३ लाख रुपये व रब्बीतील ६६४ कोटी ५७ रुपये पीककर्ज उद्दिष्टांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या (२०२२-२३) तुलनेत यंदा एकूण पीककर्जाच्या उद्दिष्टात १०० कोटी ५ लाख रुपयांनी वाढ केली आहे. यंदा शनिवार (ता.१३) पर्यंत ४ हजार १६५ शेतकऱ्यांना ३८ कोटी ८३ लाख १ हजार रुपये (३.०७ टक्के) पीककर्ज वितरित करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात १ हजार २६४ कोटी ४३ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उद्दिष्टात ६० कोटी २८ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यंदा जिल्हा बँकेला १५४ कोटी ३१ लाख रुपये पीककर्जवितरणाचे उद्दिष्ट आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा बँकेच्या पीककर्ज उद्दिष्टात २ कोटी ७२ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. व्यापारी बँकांना ९१५ कोटी ३८ लाख रुपये पीककर्जवितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले. यंदा या बँकांच्या उद्दिष्टात ४७ कोटी ४६ लाखांनी वाढ करण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १९४ कोटी ७४ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या उद्दिष्टात १० कोटी १ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. रब्बी हंगामात ६६४ कोटी ५७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या उद्दिष्टात ३९ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेला १४१ कोटी ८२ लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. त्यात यंदा उद्दिष्टात १२ कोटी ६४ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. व्यापारी बँकांना ४३१ कोटी ४ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. यंदा या बँकांच्या उद्दिष्टात २२ कोटी ३७ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
खरीप पीककर्ज वितरण स्थिती (शनिवार, ता.१३ अखेर)
बँक - उद्दिष्ट रक्कम (कोटी रुपये)- वितरित रक्कम- टक्केवारी - शेतकरी संख्या
जि. म. सहकारी बँक - १५४.३१ - ४.३२- २.८०- ८६३
व्यापारी बँका - ९१५.३८ - ११.७९- १.२९ - १०२३
महाराष्ट्र ग्रामीण बँक- १९४.७४- २२.७२ - ११.६७ - २२७९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.