Sangli Apmc Update : बाजार समिती निवडणुकीसाठी ‘ते’ नऊ माजी संचालक अपात्रच

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणातील नऊ माजी संचालकांना अपात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात केलेले अपील पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी सोमवारी (ता. १७) फेटाळले.
APMC Elections
APMC ElectionsAgrowon

Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणातील नऊ माजी संचालकांना अपात्र ठरवल्याच्या निर्णयाविरोधात केलेले अपील पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी सोमवारी (ता. १७) फेटाळले.

यामुळे अखेर ते माजी संचालक निवडणुकीसाठी अपात्रच ठरले. बाजार समितीचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किंवा सदस्य असण्यासाठी एखादी व्यक्तीने अधिनियम किंवा नियम किंवा त्याखाली केलेले उपविधी यांचा एकाहून अधिक वेळा भंग केल्यास ती अपात्र ठरते, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, पणन सहसंचालकांनी अपील फेटाळल्याने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय माजी संचालकांनी घेतला आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नऊ माजी संचालकांच्या उमेदवारीवर अनिल शेगुणसे यांनी आक्षेप घेतला होता.

APMC Elections
Pune APMC Election : राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला एक जागेवर बोळवण

माजी संचालकांनी गैरव्यवहार केल्याच्या ठपका चौकशी अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये माजी सभापती संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे या संचालकांकडून जमीन खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला आहे.

या कारणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केलीहोती. चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी नऊ माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरविले. या निर्णयाविरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे अपील केले होते.

माजी संचालकांच्या वतीने अ‍ॅड. धरणीधर पाटील यांनी तर तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. राजेश जामदार यांनी मत मांडले. सुरवसे यांनीही निंबाळकर यांच्याकडे १३ एप्रिल रोजी बाजू मांडली होती. बाजार समितीच्या अपहारामध्ये माजी संचालक दोषी आढळले आहेत.

त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य आहे. त्याप्रमाणे पणन संचालकांनीही माजी संचालकांना अपात्र करण्याबाबतची बाजू मांडली होती, परंतु पणन विभागाने निर्णय राखून ठेवला होता. माजी संचालकांबाबतचे अपील फेटाळण्यात आल्याबाबतचे आदेश पणन सहसंचालकांनी सोमवारी (ता. १७) सायंकाळी काढले.

APMC Elections
Yavatmal Apmc Election : यवतमाळ जिल्ह्यातील १३९ उमेदवारांचे अर्ज बाद

वसुलीबाबत कार्यवाही सुरू

सांगली बाजार समितीच्या चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ५७ अन्वये द्विसदस्यीय न्यायाधीकरणाची नेमणूक करण्यात आली आहे. वसुलीबाबत कार्यवाही सुरू असल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com