
Sindhudurag Dairy News : दुग्धोत्पादन आणि शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषद, जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध (Gokul Milk) संघ यांच्यामध्ये तीन सामंजस्य करार करण्यात आले.
कृत्रिम रेतन, देवदाता निर्माण करणे, आदर्श गोठा बांधणी आणि बायोगॅस बांधणी (Biogas) यासाठी हे करार करण्यात आले आहेत.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात पुढील पाच वर्षांत १ लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बँकेकडून काम सुरू आहे.
आता दुग्धवाढ आणि जिल्ह्यात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि गोकुळ दूध या चार सामंजस्य करार करण्यात आले.
या करारावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्रमोद गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विनायक ठाकूर, डॉ. विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.
कृत्रिम रेतन सेवादाता असा पहिला करार करण्यात आला. याअंतर्गत जिल्ह्यातील १०० सुशिक्षित बेरोजगार युवकांना ३५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
एका प्रशिक्षणार्थीवर २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद ५० टक्के, जिल्हा बँक २५ टक्के आणि शिफारस करणारी संस्था २५ टक्के खर्च करणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोपाळ सेवादाता यांना आवश्यक साहित्य ‘भगीरथ’ पुरविणार आहे.
दुसरा करार आदर्श गोठा बांधणीसंदर्भात झाला आहे. यासाठी लाभार्थी निवड दुग्ध संस्था आणि पशुधन अधिकारी करतील १० जातीवंत दुधाळ जनावरांसाठी जिल्हा बँक १ लाख ६० हजार रुपये ब्रीज लोन उपलब्ध करून देणार आहे.
जिल्हा परिषद नरेगातून ६ जातिवंत जनावरांसाठी ७७ हजार रुपये तर १८ जातीवंत जनावरांसाठी २ लाख ३१ हजार रुपये अनुदान देणार आहे.
तिसरा करार बायोगॅस बांधणीसाठी झाला. गावाची निवड जिल्हा परिषद करणार आहे. तर नरेगांतर्गत २० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
भगीरथ प्रशिक्षित गवंडी पुरविण्याचे काम करणार आहे. अनुदान मिळेपर्यंत काम थांबू नये म्हणून जिल्हा बँक कर्जपुरवठा करणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.