Agricultural Technology : सगरोळीत तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले जाते.
Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon

Nanded News : सगरोळी (ता. बिलोली) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे (Sagaroli Agricultural Science Centre) बुधवारपासून (ता. १५) तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवास (Agriculture Technology Festival) सुरवात होणार आहे. सकाळी ११ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, स्वागताध्यक्ष जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे तर अध्यक्षस्थानी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख राहणार आहेत.

यावेळी हवामान अभ्यासक पंजाब डख मार्गदर्शन करणार आहे. परभणी कृषी विद्यापीठाचे डॉ. देवराव देवसरकर, यशदाचे भीमराव वराळे, नाबार्डचे व्यवस्थापक दिलीप दमय्यावर, पशुसंवर्धन चे उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी आदी उपस्थित राहणार आहेत.

Agriculture Technology
Agriculture Fund : कृषी, पशुसंवर्धनचा ५९ टक्के निधी खर्च

गुरुवारी (ता. १६) रोजी महिला शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, रिलायन्स फाउंडेशनचे नितीन शर्मा, महिला विकास आर्थिक महामंडळाचे चंदनसिंग राठोड तर कोल्हापूर येथील भारत अप्पा पाटील व परभणी विद्यापीठाच्या डॉ. जया बंगाळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

तर शुक्रवारी (ता. १७) रोजी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी मिश्रा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदचे डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या उपस्थिती समारोप होणार आहे.

यावेळी आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील व थरमॅक्स ऑनसाईट एनर्जी सोल्यूशनचे व्यवस्थापक डॉ. राम चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शेतकऱ्यांना मेजवानी...

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केल्या जाते. तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकरी मेळावा, पिक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, कृषी प्रदर्शन, महिला मेळावा, चर्चासत्रे व याशोगाधा, धान्य महोत्सव व पिक स्पर्धा, तज्ञांचे मार्गदर्शन आदींचे आयोजन केले आहे.

विविध कंपन्या, बचतगट, शेतकरी गटांचे जवळपास शंभर स्टॉल लागणार आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com