Sangamner Mega Festival : संगमनेरला तीन दिवस मेगा सांस्कृतिक महोत्सव

यावर्षी हा महोत्सव गुरुवार (ता. २३) शनिवार (ता.२५) पर्यंत अमृतवाहिनीतील मेधा मैदानावर होत आहे.
Mega Festival
Mega FestivalAgrowon

Sangamner Mega Festival News : अमृतवाहिनी शेती (Agricultural) व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होत असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मेधा सांस्कृतिक महोत्सवाचे गुरुवार (ता. २३) ते शनिवार (ता.२५) या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

संगमनेर येथे सहा वर्षांपासून मेधा महोत्सव घेतला जातो. यामध्ये डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिनेअभिनेता विवेक ओबेराय, सिने अभिनेत्री मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, शेखर सुमन, अध्ययन सुमन, हास्यसम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके यांसह विविध कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

Mega Festival
Agricultural Technology : सगरोळीत तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव

यावर्षी हा महोत्सव गुरुवार (ता. २३) शनिवार (ता.२५) पर्यंत अमृतवाहिनीतील मेधा मैदानावर होत आहे.

यामध्ये गुरुवारी (ता.२३) पानिपतकार विश्वास पाटील व आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश, संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, शरयूताई देशमुख, इंद्रजित थोरात, दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मेधा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

संध्याकाळी ६ वाजता कॉमेडियन मंगेश काकड हे उपस्थित असतील. शुक्रवारी (ता. २४) फेब्रुवारीला आयएएस अधिकारी राजेश पाटील व युवा प्रबोधनकार गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी ६ वा. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व श्रेयस तळपदे उपस्थित राहणार आहेत.

Mega Festival
Nagar Festival : धान्य, बचत गटांसाठी महोत्सव

शनिवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता ट्रेनर रत्नाकर अहिरे उपस्थित राहणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री कृतिका गायकवाड, नितीन उगलमुगले व संतोष वावरे असणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com