
Kolhapur News : राज्यातील ऊस गळीत हंगामाच्या (Sugarcane Crushing) अंतिम टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. शनिवार (ता. १२) अखेर ३ साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील दोन, तर पुणे जिल्ह्यातील एक कारखाना बंद (Sugar Factory) झाला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उतारा अद्यापही कमी आहे. राज्याने दहा टक्के साखर उताराही ओलांडलेला नाही. गेल्या हंगामात या कालावधीत १०.१४ टक्क्यांपर्यंत साखर उतारा होता.
या हंगामात ९.८० टक्क्यांपर्यंत साखर उतारा जात आहे. हंगाम अंतिम टप्प्यात येत असतानाही कमी साखर उताऱ्याची समस्या भेडसावत आहे.
राज्यात ऊसतोडणी गतीने सुरू झाली असली, तरी साखर उताऱ्यात घट असल्याने फारसे उत्साहवर्धक चित्र नाही. कोल्हापूर विभाग सर्वाधिक ११.२ टक्के साखर उताऱ्याने राज्यात आघाडीवर आहे.
या खालोखाल नांदेड विभागाने ९.८५ टक्के उतारा मिळवत द्वितीय स्थान मिळवले आहे. नागपूर विभागाचा उतारा सर्वात कमी म्हणजे ८.८७ टक्के आहे.
अंदाज चुकू लागले
गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन जास्त होण्याचा अंदाज हंगाम सुरू होण्याअगोदर व्यक्त करण्यात आला होता. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन होईल, अशी अटकळ होती.
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र साखरेच्या उत्पादनात अग्रेसर असला, तरी एकरी उत्पादन घटत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
११ फेब्रुवारीअखेर गाळपाची स्थिती
विभाग-गाळप (लाख टन)-साखर उत्पादन (लाख क्विंटल)
कोल्हापूर-१९२-२१७
पुणे-१७४-१७१
सोलापूर-१९६-१७७
नगर-१०५-९९
औरंगाबाद-७७-७०
नांदेड-७९-७८
अमरावती-६-६
नागपूर-४-३
एकूण-८३५-८२०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.