अंबाबरवा अभयारण्यात वाघ, बिबट्यांचे वास्तव्य

यंदा अंबाबरवा अभयारण्यात तब्बल सहा वाघ, सहा बिबट, ७० निलगायी असल्याचे आढळून आले आहे.
Tiger
TigerAgrowon

अकोला ः सातपुड्यात विस्तारलेले अंबाबरवा अभयारण्यातून चांगली बातमी समोर आली आहे. यंदा झालेल्या प्राणी गणनेत सहा वाघ, सहा बिबट आढळून आले आहेत. याशिवाय सुमारे ७० निलगायींचा अधिवास असल्याचे दिसून आले. बुद्ध पौर्णिमेला केलेल्या वन्यजीव विभागाच्या प्राणी गणनेत आशादायी आकडेवारी समोर आली आहे.

यंदा अंबाबरवा अभयारण्यात तब्बल सहा वाघ, सहा बिबट, ७० निलगायी असल्याचे आढळून आले आहे. या अभयारण्यात ८०१ प्राणी मिळून आले. सातपुडा पर्वताच्या डोंगरदऱ्यात हे अभयारण्य सुमारे १४ हजार हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे प्राणी गणना होऊ शकली नव्हती. या वर्षी प्राणी गणना केली असता चांगल्या बाबी समोर आल्या. अंबाबारवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले. १६ मेला दुपारी ४ वाजेपासून निसर्ग अनुभव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

हा कार्यक्रम मंगळवारी (ता. १७) सकाळी ८ वाजेपर्यंत राबविण्यात आला. यामध्ये वाघ ६, बिबट ६, अस्वल १५, तडस २, नील गाय ७०, सांबर ४९, भेडकी २८, गवा ४८, रान डुक्कर १७२, लंगूर २, माकड १५५, म्हसण्या उद ११, रान कोंबडी ५४, रानमांजर १, मोर १५१, ससा १०, सायाळ १२, कोल्हा २, लांडगा ७ असे एकूण ८०१ प्राण्यांची नोंद झाली. अभयारण्यात ७ नैसर्गिक १८ कृत्रिम अशा एकूण २५ पाणवठ्यांवर २५ मचान उभारण्यात आले होते. १६ वनरक्षक, ३५ वनमजूर, ४ वनपाल, ५ विशेष व्याघ्रदलाचे जवान या वेळी कर्तव्यावर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com