शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर देण्याचे नियोजन

पुणे जिल्हा परिषद व पुणे नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा गाळमुक्त लघुपाटबंधारे योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामती तालुक्यातील पाझर तलावांतील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला.
fertilizer
fertilizerAgrowon

पुणे : ‘‘शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर आवश्यक बाबी वेळेवर मिळाव्यात, यासाठी नियोजन करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा परिषद व पुणे नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा गाळमुक्त लघुपाटबंधारे योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामती तालुक्यातील पाझर तलावांतील गाळ काढण्यास प्रारंभ पवार यांच्या हस्ते भिलारवाडी येथे शनिवारी (ता. १४) करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग कांजाळकर, स्नेहा देव, नाम फाउंडेशनचे मल्हार पाटेकर, गणेश थोरात, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, पुणे जिल्हा सह-बँकेचे संचालक संभाजी होळकर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पावसाळ्यात परिसरातील धरणातील पाणी सोडावे लागत असताना पाझर तलाव भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाझर तलावातील गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेऊन जावा. तसेच पावसात पुन्हा गाळ तलावात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी असते. म्हणून या भागातील गाळ काढण्यात येणार आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना योजना मंजूर केल्या आहेत. पुढील २५ वर्षांतील गरज लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा देण्यात येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहे.

प्रसाद म्हणाले, ‘‘११४ पाझर तलावातील गाळ काढण्यात येईल. जिल्हा परिषद सेस फंडातून १ कोटी २२ लक्ष रुपये डिझेलसाठी देण्यात येतील. गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल. उर्वरित गाळ गायरान जमिनीवर आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रावर टाकण्यात येईल. नवीन पाणी साठवण संरचनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com