Soybean Production : सोयाबीन उत्पादन अन् गुणवत्ता वाढीच्या टिप्स

Soybean Cultivation : सोयाबीनची लावण करताना सुधारित तंत्रज्ञानातील बाबींचा अभ्यास करावा. त्यानुसार त्यांचा अंगीकार व व्यवस्थापन केल्यास एकरी समाधानकारक उत्पादकता व गुणवत्ता मिळवणे शक्य होईल.
Soybean Production
Soybean ProductionAgrowon

Soybean Sowing : सोयाबीनची लावण करताना सुधारित तंत्रज्ञानातील बाबींचा अभ्यास करावा. त्यानुसार त्यांचा अंगीकार व व्यवस्थापन केल्यास एकरी समाधानकारक उत्पादकता व गुणवत्ता मिळवणे शक्य होईल. त्यासंबंधातील येथे दिलेल्या टिप्स शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरतील.

सोयाबीन व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

-मागील खरिपात अथवा उन्हाळी हंगामात ज्या शेतात सोयाबीन घेतले होते त्या शेतात पुन्हा यंदाच्या हंगामात हे पीक घेऊ नये. फेरपालटीस प्राध्यान्यक्रम द्यावा.

- मागील हंगामात पुढील दोन बाबींमुळे उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले.

१) जास्त पावसाच्या स्थितीत शेतात पाणी साचून राहिल्याने मूळसड व मानकुज या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला.

२) पिकाची अतिरिक्त वाढ झाल्याने किंवा पीक दाटल्याने खोडमाशीच्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादकता कमी झाली.अशा शेतांत पुन्हा सोयाबीन घेण्याशिवाय पर्याय नसल्यास नांगरट १५-२० सेंमी खोलीपर्यंत करावी.

-अळीच्या नियंत्रणासाठी शेवटची वाही देताना (वखरणी/ कुळवण) अथवा रोटाव्हेर वापरताना अथवा पट्टीपास मारताना एकरी ४ ते ५ किलो कारटाप हायड्रोक्लोराइड अथवा दाणेदार क्लोरपायरिफॉस शिफारशीनुसार द्यावे.

-मूळसड, मानकुज व खोडमाशीची अळी यांच्यापासून प्रतिबंध म्हणून शिफारशीत रसायनांची बीजप्रक्रिया करावी.

-पेरणीच्या दिवशी सकाळी अथवा पेरणीपूर्वी अर्धा ते एक तास आधी जिवाणूसंघ असलेल्या घटकाची १० ते २५ मिलि किंवा द्रवस्वरूपातील ट्रायकोडर्मा ५ ते १० मिलि प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लगेच पेरणी करावी.

Soybean Production
Soybean Variety : सोयाबीन लागवडीसाठी योग्य जातींची निवड

सोयाबीनचे वाण

१) लांब कालावधीचे वाण- ११५ ते १२० दिवस- उदा. फुले संगम (केडीएस-७२६)

२) मध्यम कालावधीचे वाण- ९५ ते १०५ दिवस.

उदा.

- फुले दूर्वा (केडीएस-९९२), फुले किमया (केडीएस-७५३), पीडीकेव्ही अंबा

(एएमएस-१००-३९), पीडीकेव्ही सुवर्ण सोया (एएमएसएमबी ५-१८)

-या वाणांच्या पानांवर व शेगांवर लव असते.

-पीडीकेव्ही यलोगोल्ड (एएमएस-१००१), एमएयूएस-१६२, एमएयूएस-६१२,

एमएयूएस-१५८, जेएस २०-६९, जेएस-२०-२९, जेएस-२०-११६

३) कमी कालावधीचे वाण- ८०-९० दिवस

उदा.

जेएस -२०-३४, जेएस-९५-६०,

एमएयूएस -४७, जेएस-९३०५

जमिनीचा पोत प्रकार, ओलिताची सोय, पेरणीची वेळ, वाणाचा प्रकार आदींनुसार पेरणी अंतरात बदल करावा.

-कमी कालावधीच्या वाणांची प्रचलित पद्धतीने पेरणी करताना दोन ओळींतील अंतर कमी केल्यास उत्पादकतेत वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

-सलग पीक घेण्यासाठी प्रति एकरी बियाणे किती वापरावे याबाबत शेतकरी व तज्ज्ञांमध्ये दुमत आढळून येते. आधीच्या शिफारशीनुसार प्रति एकर ३० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे अशी शिफारस होती. आता एकरी २२ ते २४ किलो बियाणे वापराविषयी तज्ज्ञ सांगतात.

- सुधारित जोडओड पद्धतीत टोकण पद्धतीच्या पेरणीत केवळ १३-१७ किलो बियाणे प्रति एकर लागते. टोकण पद्धतीत दोन झाडांतील अंतर ६ ते ९ इंच राखले जाते. त्या वेळी प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बियाणे लावणे उत्तम.

-नावीन्यपूर्ण सुधारित पट्टापेर पद्धतीचा अवलंब करताना नेमकी कितवी ओळ खाली ठेवली आहे. त्यानुसार प्रति एकर बियाणे लागेल. बीबीएफ यंत्राने पेरणी करताना प्रति एकर २२ किलो बियाणे लागेल.

-उपलब्ध पेरणी यंत्राचा (टॅक्टरचे अथवा बैलजोडीचे) वापर करून सुधारित जोडओळ अथवा सोडओळ (पट्टापेर) पद्धतीचा वापर होऊ शकतो. परिसरात उपलब्ध यंत्राद्वारे सुलभपणे पेरणी शक्य होते. पिकाची निगराणी, निरीक्षण, फवारणीसाठी जागा,

ओलितासाठी स्प्रिंकलरचे पाइप वापरण्यासाठी जागा, वेळेत फवारणी व ओलित, कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी जलसंवर्धन, जास्त पावसाच्या स्थितीत पिकाची होणारी हानी टाळणे या बाबी शक्य होतात.

-पीक आणि तणे यांच्यातील तीव्र स्पर्धेचा काळ पेरणीपासून ३२ ते ३५ दिवसांपासून ते ४० ते ४२ दिवसांपर्यंत असतो. यात प्राधान्याने मजुरांद्वारे निंदणी (खुरपणी), डवऱ्याचे फेर (कोळपणी), पेरणीपश्‍चात मात्र उगवणीपूर्व व उगवणी पश्‍चात तणनाशकाचा वापर असा क्रम ठेवावा.

-पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलीन (३८.५ टक्के) ३५ ते ५० मिलि अथवा पेंडीमिथॅलीन (३० टक्के ५०- ते ७० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. उगवण पश्‍चात तणनाशक फवारताना जमिनीत योग्य ओलावा असणे गरजेचे आहे.

-नावीन्यपूर्ण जोडओळ किंवा सोडओळ सुधारित पद्धतीने पेरणी केली असल्यास डवरणी झाल्यानंतर लगेच खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी दांड अथवा सरी पाडून घ्याव्यात. म्हणजेच कमी पावसाच्या स्थितीत मूलस्थानी जलसंवर्धन, तर जास्त पावसाच्या स्थितीत पाण्याचा योग्य प्रकारे निचरा शक्य होईल. पट्टापेर किंवा जोडओळ पद्धतीत शेताच्या उताराला आडवी पेरणी केली असल्यास ही बाब शक्य होते.

-पीक १५ ते २० दिवसांचे असताना (२ ते ३ पानांच्या अवस्थेत) इमॅझिथायपर + इमॅझोमॉक्स (७० टक्के डब्ल्यूजी) या तणनाशकाचा वापर शिफारशीनुसार करता येईल.

Soybean Production
Soybean Seed Rate : ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याचे दर यंदा कमी

-पीक १० ते १२ दिवसांचे असताना मूळकुज, मानकुज व खोडमाशीच्या अळींच्या नियंत्रणासाठी पुढील उपाय करावा. नॅपसॅक पंपाच्या नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून थायामेथोक्झॉम (३० टक्के एफएस) - ३.३३ ग्रॅम ते ६.६६ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सोबत कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅमचाही वापर करता येईल.

-१२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या खतांच्या ग्रेडचा व शिफारशीनुसार वापर करताना प्रति एकरी ८ ते १० किलो गंधक अथवा झिंक सल्फेट वापरावे. २०:२०:०:१३ या ग्रेडचा वापर करावयाचा झाल्यास गंधकाचा वापर करण्याची गरज नाही. परंतु या ग्रेड मध्ये पालाश नसल्याने सोबत प्रति एकर अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करावा.

-डीएपीचा वापर करावयाचा झाल्यास सोबतच प्रति एकर अर्धा बॅग म्युरेट ऑफ पोटॅश व ८ ते १० किलो झिंक सल्फेट अथवा गंधकाचा वापर करावा लागेल.

-एसएसपी खतात १२ टक्के गंधक व १८ टक्के कॅल्शिअमही असते. त्यामुळे हे खत भूसुधारकाचेही काम करते. जमिनीतील हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते.

-चुनखडीयुक्त जमिनीत प्रति एकर पाच किलो फेरस सल्फेट द्यायला हवे. रासायनिक खत मात्रेत व खर्चात बचत करावयाची झाल्यास प्रति एकर द्यावयाचे शेणखत अधिक अर्धी खत मात्रा योग्य प्रकारे मिसळून द्यावी. विद्राव्य खतांद्वारेही अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.

-मूळसड, मानकुज, खोडमाशीची अळी व चक्रीभुंगा यांच्या नियंत्रणासाठी पीक १० ते १२ दिवसांचे असताना पहिली, फुलोरा येण्याच्या आठ दिवस आधी दुसरी, सोबत १२-६१-० १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

-सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त ग्रेड -सेकंड खताचा वापरही सोयाबीनसाठी लाभदायक ठरतो.

संपर्क - जितेंद्र दुर्गे - ९४०३३०६०६७, सहयोगी प्राध्यापक (कृषिविद्या) श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com