`टॉयलेट घोटाळ्याची चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करावी`

जळगाव जिल्ह्यातील टॉयलेट घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.
Toilet Scam
Toilet ScamAgrowon

रावेर, जि.जळगाव : पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन (Swach Bharat Mission) विभागातील दीड कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून याची चौकशी (Investigation) करावी तसेच सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून होत असलेल्या या विभागातील कथित अपहाराला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही तितकेच जबाबदार असून झारीतले शुक्राचार्य कोण, याचा शोध घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आला. (Toilet Scam)

माजी आमदार अरुण पाटील यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून सलग भारतीय जनता पक्षाचे शासन येथील पंचायत समितीवर असून सर्व सभापती ही त्याच पक्षाचे आहेत. अशावेळी कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली अन्यत्र झाली असता त्याला पुन्हा रावेर तालुक्यात आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले, हे जनतेसमोर आले पाहिजे. या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कोणाचा वरदहस्त आहे याचीही चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मेहमूद, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. आर. चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, गणेश चौधरी (अजनाड), पंकज वाघ उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com