मेळघाटात आता पारंपरिक घुंगरू बाजाराचा वेध

जगाने विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रगती केली असली किंवा आपल्या परंपरा रितीरीवाजाला आधुनिक समाजाने मूठमाती दिली
Tribal
Tribal Agrowon

चिखलदरा, अमरावती : जगाने विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रगती केली असली किंवा आपल्या परंपरा रितीरीवाजाला आधुनिक समाजाने मूठमाती दिली असली तरी मेळघाटातील आदिवासी बांधव आजही शेकडो वर्षांपासून चालत आलेली संस्कृती, परंपरा जोपासताना दिसून येत आहेत.

Tribal
Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

आजही आपल्या पारंपरिक पेहरावात सध्या मेळघाटातील विविध ठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारात आदिवासी बांधव दिसून येत आहेत. आठवडी बाजारात गुरेढोरे, चराई करणारे बांधव आठवडी बाजारात घुंगरू बांधून व बासरी वाजवत पारंपरिक पेहराव धारण करून मनसोक्त नाचताना दिसून येत आहेत.

याबरोबरच बाजारात येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजनसुद्धा तितक्याच ताकदीने करताना दिसून येत आहेत. वर्षभर गावातील गुरे चारणाऱ्या बांधवांना दिवाळीनिमित्त पाच दिवस गावकऱ्यांकडून सुट्टी दिली जाते. हे पाच दिवस गावातील नागरिक आपापली गुरे स्वतः जंगलात नेऊन चराई करतात. तर थाट्या बांधव गावातील प्रत्येक घरापर्यंत तर आजूबाजूच्या आठवडी बाजारात वर्षभर मिठ, मिरचीसह जीवनावश्यक वस्तू दिवाळीनिमित्त भेट म्हणून मागतात.

तर त्या मोबदल्या गावातील गुरे ते वर्षभर चराई करतात. अशी ही परंपरा अनेक वर्षांपासून मेळघाटात चालत आली आहे. त्यामुळे सध्या मेळघाटातील धारणी, हरीसाल, चुर्णी, काटकुंभ, हतरू, बिजू धावडी अशा अनेक ठिकाणी आठवडी बाजारात थाट्या बांधव पायात घुंगरू व बासरी तसेच वर्षभर ज्या काठीच्या आधाराने जंगलात गुरे चराईचे काम करतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com