GI Rating : ‘जीआय’ मानांकनासंबंधी डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon

Solapur News : अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ Pomegranate Growers Association), कृषी विभाग, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने आणि नाबार्ड, अपेडा, राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुण्याच्या सहकार्याने पंढरपुरात येत्या ११ एप्रिलला डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘जीआय’ मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र वितरण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपुरातील कराड नाक्यानजीक यश पॅलेसमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होईल. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे असतील.

Pomegranate
Market Bulletin : दोन वर्षांनंतर अमेरिकेत आंबा, डाळींब निर्यात होणार

तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, अपेडाच्या उपसरव्यवस्थापक सौ. विनिता सुधांशू, चेन्नईच्या ट्रेडमार्क आणि जीआय विभागाचे वरिष्ठ परीक्षक प्रशांतकुमार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापक नितीन शेळके, डाळिंब केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड, फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे सल्लागार गोविंद हांडे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन, डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, उपाध्यक्ष प्रताप काटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. त्यानंतर आता डाळिंब उत्पादकांना ट्रेडमार्क आणि जीआय विभाग चेन्नई येथून अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

या प्रमाणपत्राचा वापर डाळिंब विक्री आणि निर्यातीसाठी करता येणार आहे. या अनुषंगाने हे प्रशिक्षण होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डाळिंब संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com