Minister Uday Samant : मजले येथील ड्रायपोर्टसाठी जमीन हस्तांतरण प्रस्ताव द्या

मजले (ता. हातकणंगले) येथील नियोजित ड्रायपोर्टसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे महामार्ग प्राधिकरणाला जमीन हस्तांतरित होणार आहे.
Uday Samant
Uday SamantAgrowon

Kolhapur News : मजले (ता. हातकणंगले) येथील नियोजित ड्रायपोर्टसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे महामार्ग प्राधिकरणाला जमीन हस्तांतरित होणार आहे. त्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी येथे दिली.

दरम्यान, शाहूवाडी आणि आष्टा येथे औद्योगिक वसाहतीला उद्योग विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

माने म्हणाले, की मुंबई येथे उद्योगमंत्री सामंत यांच्या निवासस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. तरुणांना त्यांच्या तालुक्यात रोजगार मिळावा, यासाठी चार वर्षांपासून ‘एमआयडीसी’ स्थापन व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले.

Uday Samant
Uday Samant : इंडियाबुल्सने उद्योग उभारावेत; अथवा जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी

लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघात शाहूवाडी व आष्टा येथे ‘एमआयडीसी’ होणार आहेत. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह कोल्हापूर, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार गुरुवारी (ता. २०) शाहूवाडी, आष्टा, तसेच मजले येथील जागेची पाहणी करण्यात येणार आहे.

बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, ‘एमआयडीसी’चे बिपीन शर्मा, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सहसचिव संजय देगावकर, उपमुख्य कार्यकारी आधिकारी शिवाजी पाटील, प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, सांगली प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, शाहूवाडी तालुकाप्रमुख विजयसिंह देसाई, भाऊसाहेब आवले उपस्थित होते.

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सागर मलगुंडे, वीर कुदळे यांची या बैठकीस ऑनलाईन उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com