Officers Transfer In Akola : अमरावती विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमरावती महसूल विभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सर्वाधिक चार अधिकारी बुलडाणा जिल्ह्यातून बदलून गेले आहेत.
Department Of Revenue
Department Of RevenueAgrowon

Akola News : अमरावती महसूल विभागात (Amravati Revenue Department) उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सर्वाधिक चार अधिकारी बुलडाणा जिल्ह्यातून बदलून गेले आहेत.

महसूल खात्यात उपविभागस्तरावर मोठे फेरबदल झाले असून नवीन अधिकारी तेथे नियुक्त करण्यात आले आहेत. अकोल्यात उपविभागीय अधिकारी म्हणून शरद जावळे यांनी पदभार स्वीकारला.

बुलडाणा एसडीओ राजेश्‍वर हांडे यांची यवतमाळ, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांना नगर जिल्ह्यात पदस्थापना मिळाली आहे. जिल्ह्यातील गणेश राठोड, वैशाली देवकर यांचीही बदली झाली आहे.

अमरावती विभागात मोर्शी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीनकुमार हिंगोले यांना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे पदस्थापना देण्यात आली आहे. तर वणी येथील उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना अकोला उपविभागीय अधिकारी नेमण्यात आले.

Department Of Revenue
Tehsildar On Protest : महसूल विभागाचे कामकाज ठप्प

अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या ठिकाणी उपविभागीय अधिकारीपदी पदस्थापना मिळाली.

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांची वाशीम येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. वाशीमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पदावर काम करतील.

अकोला पुनर्वसन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार बुलडाणा येथे याच पदावर नेमण्यात आले. यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे वाशीम जिल्ह्यात कारंजा येथे उपविभागीय अधिकारी, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी मोर्शी अमरावती उपविभागीय अधिकारी, मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांची नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पारनेर येथे उपविभागीय अधिकारी तर अमरावतीचे भूसंपादन अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांची जळगाव जिल्ह्यातील एरंडोलला उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली.

अकोल्याचे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांची नियुक्ती नाशिकमधील येवला येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com