युरियाच्या २४० बॅगसह ट्रक जप्त

बनोडा पोलिसांनी तालुक्यातील पांढरघाटी येथे (एमएच ४० सिडी ३९४४) क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्या वाहनातून २४० बॅग वाहून नेल्से जात असल्याचे निदर्शनास आले. मालाची तपासणी करून पोलिसांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली.
युरियाच्या २४० बॅगसह ट्रक जप्त
UreaAgrowon

वरुड, जि. अमरावती : युरियाच्या (Urea) पोत्यांची परराज्यांत तस्करी होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले. युरियाची पोती वाहून नेणारा ट्रक बेनोडा शहीद पोलिसांनी गस्तीदरम्यान पकडला. ट्रकसह २४० बॅग युरिया खत जप्त करण्यात आले.

खरीप हंगामाची सुरुवात झाली असून, बी-बियाणे व खाते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बनोडा पोलिसांनी तालुक्यातील पांढरघाटी येथे (एमएच ४० सिडी ३९४४) क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्या वाहनातून २४० बॅग वाहून नेल्से जात असल्याचे निदर्शनास आले. मालाची तपासणी करून पोलिसांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी कल्पना काणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार सावळे, तंत्र अधिकारी राजेश जानकर, जिल्हा गुणनियंत्रक दादासो पवार, विस्तार अधिकारी तन्मय गावंडे आदींनी जप्त आयशर ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये प्रत्येकी ४५ किलो वजनाची २४० युरियाची ६३, ९६० रुपये किमतीची पोती आढळून आली.

ट्रॅकचालक रामगोपाल कन्हैयालाल उरिया (वय ३७, रा. आठनेर, जिल्हा बैतुल मध्य प्रदेश) याला हे खत कोणाकडून खरेदी केले व कोठे घेऊन जात होता, यासह खताच्या देयकाबाबत विचारणा केली, सदरचे खत बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील खत विक्रेत्याकडून विना पावतीचे २८० रुपये प्रति बॅग प्रमाणे ६७ हजार २०० रुपयात रोखीने खरेदी करून ते मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले.

अनुदानित रासायनिक खतांचा गैरवापरासाठी बाहेर राज्यात खतांची तस्करी होत असल्याचे दिसून येते. मंजूर आवंटनातील पुरवठा झालेले अनुदानित खत परराज्यात विक्री करणे, अनुदानित खतांवरील मिळणाऱ्या अनुदानाचा गैरमार्गाने वापर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सकृतदर्शनी दिसून आल्याने, रामगोपाल उरिया व मलकापूर येथील अज्ञात कृषी सेवा केंद्र व सहभागी अन्य व्यक्ती यांनी संगनमताने हा कट रचला. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार बेनोडा शहीद पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com