साहित्यातला ‘खरे’पणा

आपण मराठी वाचक नेहमी एका ठोकळेबाज आणि नॉस्टॅल्जिक लिखाणावर प्रेम करत आलो आहोत. मराठी साहित्यात कुणी काहीतरी वेगळं, सकस असं लिहू पाहत असेल तर सहज स्वीकारतो का आपण?
Nanada Khare
Nanada KhareAgrowon

अजिंक्य कुलकर्णी

आपण मराठी वाचक नेहमी एका ठोकळेबाज आणि नॉस्टॅल्जिक लिखाणावर प्रेम करत आलो आहोत. मराठी साहित्यात कुणी काहीतरी वेगळं, सकस असं लिहू पाहत असेल तर सहज स्वीकारतो का आपण? आज किती मराठी तरुण विद्यार्थी/विद्यार्थिनींना नंदा खरे हे नाव तरी माहीत आहे? २२ जुलै २०२२ रोजी नंदा खरे गेले. जिथे साधं त्यांचं नावही माहीत नसेल तिथे या एवढ्या मोठ्या लेखकाचं साहित्य वाचण्याची तसदी तरी कोण घेणार?

Nanada Khare
Cotton: कापूस उत्पादकांना सरकारचा कोरडा उपदेश

आज आपल्याला युवाल नोवा हरारीचं ‘सेपियन्स’ हे पुस्तक माहीत असतं, पण हा हरारी नावाचा सूर्य जगाच्या क्षितिजावर उगवण्याआधी दहा वर्षं याच नंदा खरेंनी पृथ्वीवरील मानवी उत्क्रांती या विषयावर ‘कहानी मानव प्राण्यांची’ हे किती महत्त्वाचं पुस्तक लिहिले आहे. मराठीत हा असा ग्रंथ लिहून अनंत यशवंत खरे उर्फ नंदा खरे यांनी मराठीवर खूप मोठे उपकार करून ठेवले आहेत. आपण वाचनाच्या बाबतीत इतके दरिद्री आहोत की नंदा खरेंची पुस्तके वाचण्याची साधी तसदीही कधी घेत नाही. इतकंच कशाला नंदा खरेंवर पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थिनीला साधं इतकंही माहिती असू नये की नंदा खरे हा बाबा आहे की बाई? नंदा खरे हे त्यांचं टोपण नाव आहे. यापेक्षा मोठी उपेक्षा या विद्वान माणसाची आणखी काय असू शकेल?

Nanada Khare
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

आयआयटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले नंदा खरे यांनी आयुष्यात अनेक धरणे, पूल, कारखाने बांधले. नंदा खरेंना भविष्यवेधी गोष्टी वाचण्यात फार रस होता. त्याच संकल्पनेवर आधारित त्यांची दोन पुस्तके म्हणजे ‘वीसशे पन्नास’ आणि ‘उद्या’ नावाची कादंबरी ही होय. उत्क्रांती हा विषय तर त्यांचा फार आवडीचा, त्यावरही त्यांचं अजून एक पुस्तक म्हणजे ‘जिवोत्पत्ती आणि नंतर...’ ‘अंताजीची बखर’ ही त्यांची कादंबरी विशेष उल्लेख करावा अशी आहे.

ऐतिहासिक काल्पनिक आविष्कार (हिस्टॉरिकल फिक्शन) या प्रकारात ही कादंबरी मोडते. त्यात या कादंबरीत विडंबनात्मक लेखन वाचायला मिळते. एडवर्ड ओ विल्सन या मुंगी शास्त्रज्ञाच्या ‘अँट हिल’ या कादंबरीचा तसेच प्रणय लाल यांच्या ‘इंडिका’ या पुस्तकाचा सुंदर अनुवाद नंदा खरेंनी केला आहे. ‘दगडावर दगड’, ‘ज्ञाताच्या कुंपणावर’, तसेच ‘नांगरल्याविन भुई’ ही पुस्तकेही फार वाचनीय आहेत. या व्यतिरिक्तही काही पुस्तके नंदा खरेंनी लिहिली आहेत. एखादी व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर दखल घेण्यात काही हाशील नसते. ती व्यक्ती आपल्यात असतानाच तिच्या कर्तृत्वाची दखल घ्यायची असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com