कसे कराल विहीर पुनर्भरण ?

विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होईल.
Tube Well Recharge
Tube Well RechargeAgrowon

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर (Tube well), कूपनलिका (Bore well) पुनर्भरणाचे तंत्र विकसित केले आहे. विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या (Tube well Recharge) उपाययोजना केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे शक्य होईल.

Tube Well Recharge
विहीर ः शाश्वत सिंचन स्त्रोत

शेत जमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे. या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. परंतु हे पावसाचे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये. कारण वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात माती, गाळमिश्रण असते जर असे पाणी सरळ विहिरीत सोडले तर विहिरीत गाळ साठत जातो.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते.

Tube Well Recharge
लिंबूवर्गीय फळपिकात पाणीव्यवस्थापन महत्त्वाचे

या सयंत्रात दोन प्रकारच्या गाळणी यंत्रणा आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर येणारा गाळ अडविला जातो. शुद्ध पाणी विहिरीत सोडले जाते. शेताच्या रचनेनुसार पावसाचे वाहते पाणी गाळण यंत्रणेकडे वळवावे.

शेतातील पाणी सरळ टाक्यात घेण्याऐवजी टाक्याबाहेर एक साधा खड्डा करून त्यात दगड, गोटे, रेती टाकावेत. त्यातून एका पीव्हीसी पाईपचे पाणी प्रथम प्राथमिक गाळण नियंत्रणेत घ्यावे.
शेताकडे चारीद्वारा वाहणारे पाणी प्रथम प्राथमिक गाळण यंत्रणेत घ्यावे. मुख्य गाळण यंत्रणेच्या अलीकडे १.५ मीटर बाय १ मीटर आकाराची दुसरी टाकी बांधावी. त्याला प्राथमिक गाळण यंत्रणा असे म्हणतात.

Tube Well Recharge
तांत्रिक निकषाप्रमाणे खोदा शेततळे

शेतातून वाहत येणारे पाणी प्रथम या टाकीत घ्यावे तेथे जड गाळ खाली बसून थोडे गढूळ पाणी पीव्हीसी पाईपच्या माध्यमातून किंवा खाचेद्वारे मुख्य गाळण यंत्रणेत सोडावे.

विहीर पुनर्भरण मॉडेलच्या दुसऱ्या भागाला मुख्य गाळण यंत्रणा असे म्हणतात. ही यंत्रणा विहिरीपासून दोन ते तीन मीटर अंतरावर बांधावी. यासाठी २ मीटर लांब, २ मीटर रुंद आणि २ मीटर खोल खड्डा करावा. याला आतून सिमेंट विटाचे बांधकाम करून टाकी सारखे बांधून घ्यावे. यात मुख्य गाळण यंत्रणेच्या खालील भागातून चार इंच व्यासाचा पीव्हीसी पाईप विहिरीत सोडावा या टाकीत ३० सेंटीमीटर उंचीपर्यंत मोठे दगड नंतर तीस सेंटीमीटर उंचीपर्यंत छोटे दगड व त्यानंतर तीस सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर टाकावा. असे ९० सेंटीमीटर जाडीचे गाळण थर असावे. त्यावरील ६० सेंमी भागात पाणी साठते. या काळात यंत्रने मार्फत पाणी गाळले जाऊन विहिरीत जाते.

Tube Well Recharge
Maize Production: जागतिक मका उत्पादन घटीचा अंदाज

साधारणतः दोन एकर क्षेत्रातून वाहणारे पावसाचे पाणी विहीर पुनर्भरणासाठी वापरले तर निश्चितच दोन ते तीन वर्षात विहीर पाणी पातळीत १.५ ते २ मीटर पर्यंत वाढ दिसून येते. पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण होऊ शकतो. उपलब्ध पाण्याचा वापर तुषार सिंचनाच्या माध्यमातून केल्यास पिकांचे शाश्वत उत्पादन मिळू शकते.

शेतकऱ्यांनी स्वतः वाळू, विटा, सिमेंट खरेदी करून बांधकाम केल्यास दहा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. एकदा हे बांधकाम व्यवस्थित केले तर त्याचे आयुष्यमान १० ते १५ वर्षे राहते. फक्त दर दोन वर्षांनी गाळण टाकी आणि साहित्याची स्वच्छता करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com