
Procurement Turmeric : वाशिम बाजार समितीमध्ये दर शनिवारी हळदीचे सौदे होते. नेहमी प्रमाणे आज सकाळी हळदीच्या विक्रीसाठीचे सौदे सुरू झाले तेव्हा हळदीला प्रति क्विंटल ४ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये इतका भाव मिळाला. या दरम्यान ४०० ते ५०० हळद पोत्यांची विक्रीही झाली. त्यानंतर मात्र हमीभावाच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सौदे बंद पाडले.
हिंगोली, रसोड बाजारसमितीमध्ये हळदीला ७ हजार ते साडे ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. मात्र, वाशिम बाजार समितीमध्ये कमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली व सौदे बंद पाडले गेले. त्यानंतर शेतकऱ्यांनी अकोला-हैद्राबाद रस्त्यावर ठिय्या मांडून आपले निषेध नोंदवला
गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये आवकही वाढलेली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीठ या नैसर्गिक संकटावर मात केल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेलं होते. त्यामुळे चांगला भाव येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. सध्या राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांप्रमाणेच मराठवाडा व परजिल्ह्यातील शेतकरीदेखील वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणत असतात. प्रत्येक आठवड्यातील शनिवारी हळद खरेदी केली जाते. मात्र, सकाळपासून व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव पाडल्याने शेतकरी संतप्त झाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.